Headlines

अमरावती जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी 47 टक्के:दुष्काळाचे संकेत; सर्व 14 तालुके आधीच दुष्काळग्रस्त घोषित




अमरावती जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी सरासरी ४७ टक्के घोषित करण्यात आली आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी दुष्काळाचे संकेत देते. यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर्षी पावसातील मोठ्या खंडामुळे शासनाने अमरावती जिल्ह्यातील सर्व १४ तालुके आधीच दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. यावर नजरअंदाज पैसेवारीने शिक्कामोर्तब केले आहे. जिल्ह्यात यावर्षी केवळ ५६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसात खंड असल्याने कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर ही पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यातील १९८५ गावांपैकी एकाही गावाची पैसेवारी ५० च्या वर नाही. सर्वात जास्त पैसेवारी धामणगाव रेल्वे, धारणी आणि चिखलदरा तालुक्यांची आहे, तर सर्वात कमी ४५ टक्के पैसेवारी दर्यापूर तालुक्यातून समोर आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *