Headlines

दिव्य मराठी एक्सपोज:कुंभमेळ्याच्या स्नान घाटांसाठी जमिनीचा गैरव्यवहार, कोर्टाचा आदेश डावलून ‘पाटबंधारे’ने खरेदी केली 5.11 कोटींची जमीन




सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गाेदाकिनारी स्नानघाट बांधण्यात येणाऱ्या स्नानघाटांच्या जमिनीत खरेदीचा गैरव्यवहार झाल्याचे पुढे येत आहे. न्यायालयाचा मनाईहुकूम असताना पाटबंधारे विभागाने ५ काेटी ११ लाख रुपये शासकीय निधीतून १५०० चाै.मी. जागा खरेदी केल्याचे उघड हाेत आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या या मनाईहुकूमाची नाेंद संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरही आहे. तसेच सरकारी पॅनलच्या वकिलांचा या व्यवहारासाठी नकारात्मक अहवाल असतानाही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवले. या प्रकरणाबाबत रोहित चांडोले यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी, भूसंपादन उपजिल्हाधिकारी, निबंधक आणि खासगी विक्रेत्यांसह १० जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पुढे काय?: कारवाईची टांगती तलवार : या प्रकरणात कार्यकारी अभियंता पाटबंधारे, उपविभागीय अभियंता श्रेणी १, उपजिल्हाधिकारी भूसंपादन, सह दुय्यम निबंधक आणि सातबारावरील खरेदी देणारे ६ मालक यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. अटकपूर्व अर्ज फेटाळला : या प्रकरणात चांडोले यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र काेर्टाने, “जोपर्यंत एफआयआर नोंदवला जात नाही आणि अटकेची ठोस शक्यता निर्माण होत नाही, तोपर्यंत केवळ चौकशी किंवा तक्रार अर्जाच्या आधारावर अटकपूर्व जामीन मंजूर केला जात नाही,” असा निष्कर्ष नोंदवत दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी अर्ज फेटाळला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *