Headlines

तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राची वार्षिक सभा उत्साहात:गंगापूरमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग




महिला आर्थिक विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत स्थापित तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र, गंगापूरची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर रोजी दीपाली लॉन्स, गंगापूर येथे पार पडली. प्रास्ताविक सी.एम.आर.सी. व्यवस्थापक सुनिता सहाने यांनी केले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते केंद्राच्या १७ व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या वार्षिक सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय अधिकारी जान्हवी शेखर, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड, पोलिस निरीक्षक विनायक पाटील, गंगापूरचे नगराध्यक्ष संजय जाधव, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक दीपक गवळी, आयसीसीआय बँकेचे मॅनेजर दत्तात्रय राजपूत, कृषी अधिकारी बापूराव जायभाय, नगरसेविका सुवर्णा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी जान्हवी शेखर यांनी महिलांनी विविध उद्योग व व्यवसायात आत्मविश्वासाने उतरून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे आवाहनात्मक मार्गदर्शन केले. तसेच महिला सुरक्षेच्या विषयावर विशेष मार्गदर्शन करत भविष्यात तेजस्विनी केंद्रासोबत संयुक्तपणे जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी मायक्रो इंटरप्राइज लोन व विविध सब-प्रोजेक्ट योजनांबाबत मार्गदर्शन केले. यशस्वी आयोजनासाठी केंद्राचे लेखापाल विशाल टाके, सहयोगिनी विजया कसाने, नसरीन पठाण, प्रमिला कांबळे व मनीषा दारुंटे यांनी परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *