![]()
शासनाने सरसकट दुष्काळ जाहीर केलेला असताना वैयक्तिक पंचनामे करण्यासाठी गावात आलेल्या तलाठी व सहायक कृषी अधिकाऱ्यांना पीरबावडा येथील शेतकरी व नागरिकांनी विरोध केला. दुष्काळाची भीषण परिस्थिती सर्वत्र स्पष्ट असताना प्रत्येक शेतकऱ्याचा स्वतंत्र पंचनामा करण्याची प्रक्रिया राबवू नये, अशी भूमिका घेतली. वैयक्तिक पंचनामे करण्यासाठी अधिकारी पिरबावडा येथे दाखल झाले असता शेतकरी एकत्र आले. त्यांनी पंचनामे करण्यास विरोध दर्शवत प्रशासनाकडे आपली भूमिका मांडली आणि अधिकाऱ्यांमार्फत तहसीलदारांना निवेदन दिले. या वेळी प्रदीप बोकील म्हणाले, सरसकट दुष्काळ जाहीर झालेला असताना पुन्हा वैयक्तिक पंचनाम्यांची प्रक्रिया राबविणे म्हणजे शेतकऱ्यांना अनावश्यक प्रशासकीय प्रक्रियेत अडकविणे आहे. दुष्काळाची तीव्रता सर्वांनाच माहीत असल्याने कागदोपत्री प्रक्रिया न वाढवता शासनाने तातडीने मदत व सवलतींचा लाभ द्यावा. निवेदन देताना उपसरपंच कृष्णा गाडेकर, सलीम शाहा, रामेश्वर बोकील, नाजिम मुलतानी, बाबू सुरासे, दगडूबा गायके, तातेराव बोकील व रामेश्वर गाडेकर आदी उपस्थित होते.
Source link
पीरबावड्यात शेतकऱ्यांचा पंचनाम्यांना विरोध:दुष्काळ जाहीर असताना वैयक्तिक पंचनामे कशासाठी; शेतकऱ्यांचा सवाल