Headlines

बससेवा अखेर सुरू:35 वर्षांनंतर दावरवाडीतून संभाजीनगरसाठी बससेवा




३५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पैठण तालुक्यातील दावरवाडी गावातून छत्रपती संभाजीनगरसाठी थेट एसटी बससेवा अखेर सुरू झाली आहे. १९९० मध्ये बंद पडलेली बससेवा पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांची अनेक वर्षांची मोठी गैरसोय दूर झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. पैठणकर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोर तांगडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने एसटी प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश मिळून एसटी प्रशासनाने ३० सप्टेंबर रोजी सकाळी ६:२० वाजता पहिली बस दावरवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दाखल केली. ग्रामस्थांनी चालक व वाहकांचा सत्कार करून बसचे उत्साहात स्वागत केले. या नव्या बससेवेमुळे विद्यार्थी, महिला व वृद्धांची मोठी सोय झाली आहे. रात्री ८ वाजता पैठणहून सुटणारी शेवटची बस दावरवाडीमार्गे नांदर येथे मुक्कामी जाणार आहे. त्यामुळे रात्री परतीच्या प्रवासाची कायमची सोय झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *