![]()
वाहनाच्या पार्किंगवरून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी नाळेवस्ती परिसरात मध्यस्थी करायला गेलेल्या एका ४१ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास घडली. नागनाथ मच्छिंद्र जाधव (वय ४१, रा. वेणेगाव, ता. माढा) असे मृत तरुणाचे नाव असून या हल्ल्यात सद्दाम पटवारी हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी मामा भाचा राज कदम, समाधान चौधरी याच्यासह सागर कुटे, रणजीत पवार आणि इतर दोन अनोळखी अशा सहा जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना तातडीने जेरबंद केले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृताचे बंधू महेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. सद्दाम पटवारी व राज कदम हे नाळेवस्ती येथील दत्तात्रय घाडगे यांच्या अपार्टमेंटमध्ये रहात आहेत. गुरुवार, दि. १ रोजी १०.१५ वाजण्याच्या सुमारास घरासमोरील पार्किंगमध्ये वाहन लावण्यावरून राज कदम याचा सद्दाम पटवारी यांच्याशी वाद झाला. त्यानंतर राज कदम याने त्याचा मामा समाधान चौधरी यांना फोन केला. काही वेळात समाधान चौधरी, सागर कुटे, रणजीत पवार व अन्य दोन जण पांढऱ्या रंगाच्या कारमधून घटनास्थळी आले. सद्दाम पटवारी यांच्यावर चाकू व कोयत्याने हल्ला करण्यासाठी मारेकरी धावून गेल्याचे पाहून नागनाथ जाधव हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले. त्यावेळी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात सुरूवात केली. राज कदम आणि समाधान चौधरी हे सख्खे मामा भाचे आहेत. सहा वर्षांपूर्वी समाधान चौधरी हा सुशांत चौधरी या व्यक्तीचा खून करून जतच्या वनविभागाच्या जंगलात मृतदेह नष्ट केल्याप्रकरणी मुख्य आरोपी होता. तो मागील वर्षी सुटून बाहेर आला होता. याप्रकरणी रणजीत पवार, प्रतीक बागवाले या दोन आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. नागनाथ जाधव यांच्या पाठीमागून चाकू भोकसल्याने पाठीतून चाकू फुफ्फुसामध्ये घूसून जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. मृताचे भाऊ महेश मच्छिंद्र जाधव यांनी जखमी नागनाथ यांना टेंभुर्णीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी नागनाथ जाधव यांचा मृत्यू झाला, अशी फिर्याद मृताचे भाऊ महेश मच्छिंद्र जाधव याने दिली आहे. सदर खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी दोन पोलिस पथके पाठवली असून लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येईल. -राजकुमार भुजबळ, पोलिस निरीक्षक, टेंभुर्णी.
Source link
गाडी पार्किंगवरुन मित्राचे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचाच टेंभुर्णीमध्ये भोसकून खून:मामा-भाच्यासह ६ जणांवर गुन्हा, दोघांना अटक