Headlines

रत्नापूर तलावामध्ये बुडून दोन मुलांचा मृत्यू:मित्राच्या वाढदिवसासाठी गेले होते‎




भानखेड परिसरातील जंगल भागात, भानखेड मुख्य मार्गापासून सुमारे अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नापूर तलावात दोन मुले बुडाले. ही घटना गुरुवारी २ ऑक्टोबरला सायंकाळी घडली. शहरातील आठ ते नऊ मुले तलाव परिसरात फिरण्यासाठी गेली होती. त्यापैकी दोघे तलावातील पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच मुलांचे नातेवाईक, पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान दोन्ही मुलांचे मृतदेह नातेवाईक व बचाव पथकाने गुरूवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास बाहेर काढले आहे. भावेश संतोष चव्हाण (१७, रा. ज्योती कॉलनी, गोपालनगर, अमरावती) आणि प्रवेश शैलेश कडू (१७, रा. किरणनगर, अमरावती) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. भावेश, प्रवेश हे आपल्या काही मित्रांसह गुरुवारी दुपारी रत्नापूर तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भावेश आणि प्रवेश हे तलावातील पाण्यात बुडाले. तलावात पाणी अधिक असल्याने दोघांनाही बाहेर येता आले नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तातडीने मुलांचे नातेवाईक तसेच पोलिस व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांनी भावेशला तर बचाव पथकाने प्रवेशला तलावातील पाण्यात शोधमोहीम राबवून गुरुवारी रात्री सुमारे सव्वा नऊ वाजता मृतदेह बाहेर काढले. बडनेरा पोलिस घटनास्थळी दाखल असून, ही माहिती मिळाल्यानंतर शहरापासून पाच ते सहा किलोमीटरवर असलेल्या या तलावाजवळ नागरिकांची गर्दी झाली होती. हे आठ ते नऊ मुलं त्यांच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. ते दुपारपासून या परिसरात होते. मात्र सायंकाळच्या सुमारास दोघे अचानक पाण्यात बुडाले आणि दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *