Headlines

पिकं करपली, पाण्यासाठी बी लयं भटकंती हाय बघा:मंगळवेढ्यात शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी आमदार समाधान आवताडे थेट बांधावर‎




“दादा.. हाताशी आलेली सोन्यासारखी पिकं पावसाअभावी डोळ्यांसमोर करपली बघा! माणसांसाठी आणि जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्यासाठीही लई भटकंती करावी लागतेय,” अशा शब्दांत आक्रोश करणाऱ्या शेतकरी बांधवांची व्यथा जाणून घेण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे थेट दुष्काळी भागात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. यंदाच्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळग्रस्त महमदाबाद हु., लोणार व पडोळकरवाडी या गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. या वेळी शेतकऱ्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींसमोर मनातील दुःखाला वाट मोकळी करून दिली. मतदारसंघातील जनता दुष्काळाच्या छायेत होरपळत असताना आमदार आवताडे यांनी कोणालाही वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगत मोठा धीर दिला. आमदार आवताडे म्हणाले, “पावसाअभावी शेतात उभे असलेले पीक वाया जाताना पाहणे ही अत्यंत अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. दुष्काळाची तीव्रता कागदोपत्री आकडेवारीतून नव्हे, तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समजून घेणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे. पंचनाम्याचे काम गतीने पूर्ण करून शासनाच्या मदतीचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला कडक सूचना दिल्या आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यातून शेतकऱ्यांना आवश्यक आधार मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही तांत्रिक बाबींची अट न ठेवता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, माजी सभापती तानाजी काकडे, माजी उपसभापती सूर्यकांत ढोणे, पंचायत समिती सदस्य डॉ. आप्पासाहेब निकम, संचालक गौडाप्पा बिराजदार, दादा दोलतोडे, सरंपच गुलाब थोरबोले, दत्तात्रय मळगे, माजी सरपंच कोळेकर यांच्यासह विविध खात्यांचे प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. शासन पूर्णपणे सकारात्मक ^मागील जनगणनेनुसार सॅटेलाइटमार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया न राबवता, सद्यस्थितीवर आधारित सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी शासनाची आहे. शासन या बाबतीत पूर्णपणे सकारात्मक आहे. तसेच पाण्यासाठी आवश्यक तेथे तातडीने अतिरिक्त टँकरची तरतूद करून मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. समाधान आवताडे, आमदार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *