Headlines

पुण्यात तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू:येरवडा, मुंढवा आणि हडपसर परिसरातील घटना




पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागांत झालेल्या तीन अपघातांत पादचारी आणि दुचाकीस्वार अशा तिघांचा मृत्यू झाला. येरवडा, मुंढवा आणि हडपसर परिसरात या घटना घडल्या. संबंधित अपघातांप्रकरणी वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पसार झालेल्या चालकांचा शोध सुरू आहे. येरवड्यात पादचारी तरुणाचा मृत्यू येरवड्यातील गुंजन चित्रपटगृह चौकात भरधाव मोटारीने धडक दिल्याने पादचारी तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. देवीदास सोनवणे (वय २५, रा. माऊलीनगर, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर) असे मृताचे नाव आहे. १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास देवीदास रस्ता ओलांडत असताना मोटारीने त्याला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या देवीदासचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पसार झालेल्या मोटारचालकाविरुद्ध लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक थोरवे तपास करीत आहेत. मुंढव्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू : मुंढवा-मांजरी रस्त्यावर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने अनुज बैरागी (वय ३४) यांचा मृत्यू झाला. अनुज मूळचा उत्तराखंड येथील असून, कामानिमित्त पुण्यात राहत होता. दुचाकीवरून जात असताना टेम्पोने त्याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मुंढवा पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण तपास करीत आहेत. हांडेवाडीत ज्येष्ठ नागरिकाचा बळी हांडेवाडी रस्त्यावर रिक्षाच्या धडकेत अकील मुल्ला (वय ६०) यांचा मृत्यू झाला. मुल्ला रस्त्याने जात असताना रिक्षाने त्यांना धडक दिली. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पसार झालेल्या रिक्षाचालकाविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस. जाधव तपास करीत आहेत. हेही वाचा.. कार्यालयात घुसून गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार: प्रदीप पूर्णेकर हत्याकांडात 100 CCTV फुटेज स्कॅन, पप्या शिंदेकडील गाड्या जप्त; ‘टल्ली’च्या शोधात 9 विशेष पथके ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून झालेल्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण ठाणे शहर हादरले आहे. राजकीय वैमनस्यातून घडलेल्या या थरारक गुन्ह्याची उकल करण्यासाठी ठाणे पोलिसांनी प्रचंड वेगाने तपासाची चक्रे फिरवली असून, तब्बल 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी पप्या शिंदेसह तिघांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असून, आता मुख्य संशयितांपैकी एक असलेला संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’ याच्या शोधासाठी पोलिसांची ९ विशेष पथके दिवस-रात्र छापेमारी करत आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *