Headlines

मराठवाड्याच्या हक्काचे 255 टीएमसी पाणी विनाविलंब द्या:मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीची मागणी, संभाजीनगर येथे बैठक घेणार




मराठवाड्याच्या हक्काचे एकूण मंजूर 255 टीएमसी पाणी विनाविलंब मिळावे तसेच प्रकल्पांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीने शनिवारी ता. 3 हिंगोली येथील बैठकीत करण्यात आली आहे. या मागणीसाठी मराठवाडास्तरीय बैठक छत्रपती संभाजीनगर येथे घेतली जाणार आहे. हिंगोली येथे माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांच्या् अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी माजी आमदार विजय गव्हाणे, डॉ. अण्णासाहेब शिंदे, माजी शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नंदकिशोर तोष्णीवाल, सुरेशआप्पा सराफ, मिलिंद यंबल, मिलिंद उबाळे, डॉ. रमेश शिंदे, माधव कोरडे, प्रकाश आहेर, बाबासाहेब दांडगे, विजय हारदे, गंगाप्रसाद यादव, रामदास तुरे, महेंद्र माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गोदावरी आणि कोकणातील नद्यांचे 168 टीएमसी व कृष्णा खोरे आणि विदर्भातील 86 टीएमसी असे एकूण 255 टीएमसी मंजूर पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्यात येणे बाकी आहे. पाण्याच्या अभावामुळे मराठवाड्याचा सिंचन अनुशेष तब्बल 6.18 लाख हेक्टरवर पोहोचला असून, 70 टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण झाले आहे. यामुळे शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला असून मागील आठ महिन्यांत 653 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या भयानक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरपारच्या लढ्याचा रोडमॅप तयार करण्यासाठी 11 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे बैठक घेतली जाणार आहे. कोकणातील 168 टीएमसी पाण्यापैकी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि हिंगोली जिल्ह्याला किती व कधी पाणी मिळणार, हे शासनाने स्पष्ट करावे, उजनी धरणातून 25 टीएमसी पाणी सीना खोऱ्यात देण्याच्या 2005 मधील निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, कोल्हापूर – सांगली जिल्ह्यातील अतिरिक्त पुराचे पाणी बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना त्वरित द्यावे, विदर्भातील अतिरिक्त पाणी परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना मिळावे, कलम 371 (2) नुसार वैधानिक विकास मंडळ पुनर्जीवित करून मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्यासाठी राज्यपालांनी निर्देश द्यावेत, नदी जोड प्रकल्पाचे मुख्य कार्यालय नाशिकवरून छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनाची पुढील दिशा ठरणार मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. या संदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:00 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ता. 5 नोव्हेंबर रोजी हिंगोलीत धरणे आंदोलन तर त्यानंतर नागपूर अधिवेशनावर धडक दिली जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *