Headlines

कळमनुरी गोळीबार आणि खून प्रकरण:16 जणांवर 'मकोका'; हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई




कळमनुरी येथील जूने बसस्थानक भागात गोळीबार करून खून केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या 16 जणांवर मकोका लावण्यात आला असून या प्रकरणात आता कलम वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक एन. एस. देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. एकाच वेळी 16 जणांवर करण्यात आलेली ही कारवाई हिंगोली पोलीस दलाच्या इतिहासातील मोठी कारवाई मानली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील जूने बसस्थानक भागात ता. 15 जुलै रोजी दोन गटात वाद झाला. यातून झालेल्या गोळीबारात लुकमान सिद्दीकी (38) या तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी शेरू उर्फ इम्रान पठाण यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसांनी शेख शकील, शेख जम्मू, शेख जमीर, शेख समीर, अझहर पठाण, शाहीन नाईक, फयुम नाईक, नगरसेवक किशोर भालेराव, शेख फारुख, शेख असीफ, साहील नाईक, शेख शहबाज, सय्यद फारुख, मुस्तकिण गणी, इम्रानखान पठाण, शिबगत उर्फ शिब्बु नाईक यांच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांनी तातडीने उपाधिक्षक मयुर रसाळ, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, पोलिस निरीक्षक जमीर नाईक यांचे पथक स्थापन केले होते. या पथकाने आतापर्यंत 16 पैकी 12 जणांना अटक केली आहे. या प्रकरणात अन्य चौघे जण अद्यापही फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस विभागाने या सर्व 16 जणांवर मकोका लावण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सविस्तर प्रस्ताव पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्यामार्फत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार त्यांच्याकडून मकोका कारवाईला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आज शनिवारी तारीख 3 या प्रकरणात मकोका अंतर्गत कलमवाढ करण्यात आली असून या प्रकरणाचे तपास पोलीस उपाधीक्षक एन एस देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *