Headlines

पुणे पदवीधरसाठी 55, शिक्षकसाठी 28 अर्जांचे वाटप:आजअखेर पदवीधरसाठी 205 तर शिक्षकसाठी 1387 अर्ज वाटले गेले




पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज वाटप प्रक्रियेला वेग आला आहे. शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ५५ अर्जांचे वाटप झाले. हे अर्ज ३३ व्यक्तींनी घेतले. तर पुणे शिक्षक मतदारसंघासाठी २८ अर्जांचे वाटप झाले असून, १६ व्यक्तींनी अर्ज घेतले. आजअखेरच्या आकडेवारीनुसार, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी एकूण २०५ अर्जांचे वाटप झाले आहे. हे अर्ज ११९ व्यक्तींनी घेतले आहेत. त्यामुळे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातही इच्छुकांकडून अर्ज घेण्यास प्रतिसाद मिळत आहे. आजअखेर या मतदारसंघासाठी १३७ अर्जांचे वाटप झाले असून, ७५ व्यक्तींनी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत इच्छुकांची संख्या आणि अर्ज वाटपाची प्रक्रिया लक्षवेधी ठरत आहे. दरम्यान, अर्ज वाटपाची संख्या आणि प्रत्यक्ष अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या यामध्ये फरक असतो. त्यामुळे सध्या उपलब्ध आकडेवारीवरून निवडणुकीच्या अंतिम रिंगणातील उमेदवारांची संख्या निश्चित होत नाही. अर्ज घेणाऱ्या इच्छुकांपैकी किती जण प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतात, याकडे आता लक्ष लागले आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय पक्षांसह विविध संघटनांच्या हालचालींनाही वेग येण्याची शक्यता आहे. आगामी काळात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. चौकट पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात इच्छुकांची गर्दी पुणे पदवीधर मतदारसंघ : महायुतीकडून भाजपच्या शरद लाड यांचे नाव चर्चेत असून, भाजपचे राजेश पांडे हेही इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) प्रताप ऊर्फ भैय्या माने यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षदा देशमुख यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, ३ ऑक्टोबरपर्यंत प्रमुख पक्षांनी या जागेसाठी अंतिम उमेदवारी जाहीर केलेली नाही. पुणे शिक्षक मतदारसंघ : काँग्रेसने विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीत भाजपकडून कौस्तुभ गावडे, तर शिवसेनेकडून मंगेश चिवटे आणि प्रा. डॉ. सचिन सानप इच्छुक आहेत. भाजपचा अंतिम उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *