Headlines

नाशिक काॅर्पोरेट जिहाद:मुख्य संशयित निदा खानची पतीही सोडणार साथ, नाशिक येथील न्यायालयात मागितला काडीमोड, 16 रोजी सुनावणी




आयटी क्षेत्रातील एका नामंकित कंपनीत कथित धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गंभीर आरोपाखाली तुरुंगात जाऊन सध्या जामिनावर बाहेर असलेली निदा खान ही गरोदर आहे. त्यातच आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठा भूकंप आला आहे. पती मोईन खानने तिच्यापासून विभक्त होण्यासाठी नाशिकरोड येथील कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी न्यायालयाने निदाला समन्स बजावत 16 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर निदा फरार होती. तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती मिळून येत नव्हती. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगरपर्यंत माग काढत तिला अटक केली. चौकशीत एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलने तिला आश्रय दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी पटेलसह घरमालकावर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात दोघेही सहआरोपी आहेत. कायदेशीर संकटात वैयक्तिक धक्का सध्या जामिनावर बाहेर आलेली निदा खान ही गरोदर आहे. एकीकडे तिच्यावर सुरू असलेला गंभीर फौजदारी खटला आणि दुसरीकडे तिची शारीरिक स्थिती अशा नाजूक वळणावर असतानाच पतीने थेट काडीमोड मागितल्याने तिच्या अडचणी वाढल्या आहेत. मोईन खान यांनी घटस्फोट अर्जात नेमकी कोणती कारणे नमूद केली आहेत हे अद्याप उघड झाले नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *