Headlines

राज्यात अनेक भागांतून मान्सूनची माघार:20 जिल्ह्यांत पावसाची तूट, मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळी झळ




नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्राच्या काही भागांतून माघार घेतली असून, राज्यातील ३६ पैकी २० जिल्ह्यांत पावसाची तूट नोंदवली. मराठवाड्यात पावसाची सर्वाधिक तूट असून, ७० टक्क्यांहून अधिक तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी दिली. राज्यात सर्वाधिक पावसाची तूट सोलापूरमध्ये (५८%) नोंदवली गेली. त्यापाठोपाठ बीड (५१ %), हिंगोली (४९%), जालना (४८%), अहिल्यानगर (४६%) आणि धाराशिव (४५%) यांचा क्रमांक लागतो. कोकणातील सिंधुदुर्ग (३६%), सातारा (२८%) आणि सांगलीतही (२४%) मोठी तूट आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता सर्व जिल्ह्यांत उणे ३४ ते ४९ टक्क्यांच्या दरम्यान तूट आहे. कसा ठरवला जातो मान्सून परतीचा प्रवास जेव्हा एखाद्या भागातून सलग पाच दिवस पाऊस पूर्णपणे थांबतो, वातावरणातील आर्द्रता अचानक घटते आणि जमिनीपासून दीड किलोमीटर उंचीवर वाऱ्याची दिशा बदलून घड्याळाच्या काट्यासारखी होते, तेव्हाच शास्त्रोक्त पद्धतीने मान्सूनची माघार जाहीर केली जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *