Headlines

पैठण तालुक्यात दुष्काळाची छाया;‎मजुरांचे डोळे ‘रोहयो’च्या कामांकडे‎:पुढील आठवड्यात आ. भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक




पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांचे झालेले अतोनात नुकसान आणि शेतीची कामे ठप्प झाल्याने पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. ऐन दुष्काळाच्या तोंडावर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, मजुरांना आधार देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची (रोहयो) कामे तातडीने कधी सुरू होणार, याकडे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांचे लक्ष लागले आहे. तालुक्यात यंदा खरिपाची पिके वाया गेल्याने शेतकरी आणि शेतमजूर दोन्ही अडचणीत सापडले आहेत. अशा स्थितीत रोहयो हाच रोजगाराचा एकमेव पर्याय उरला आहे. या योजनेतून विहिरी, रस्ते, वृक्षलागवड, रोपवाटिका, वृक्षसंवर्धन, तलावातील गाळ काढणे यांसारखी सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची कामे केली जातात. मात्र, प्रशासनाकडून अद्याप दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुरेशा प्रमाणात नवीन कामे सुरू करण्यात आलेली नाहीत. रोहयोची नवीन कामे सुरू करण्यासाठी आणि अपूर्ण कामांचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय स्तरावर नियोजन सुरू आहे. “तालुक्यात नव्याने कामे उपलब्ध करून देण्यासाठी पुढील आठवड्यात आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत तालुक्यातील रोजगाराच्या प्रश्नावर मार्ग काढून नवीन कामांना मंजुरी दिली जाईल. नियम, अपूर्ण कामांचा अडसर रोहयोच्या नियमानुसार, ग्रामपंचायत हद्दीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक कामे अपूर्ण असल्यास नवीन कामांना मंजुरी देण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे मजूर उपलब्ध असून आणि कामाची गरज स्पष्ट दिसत असतानाही तांत्रिक नियमांमुळे नवीन कामांच्या मंजुरीची अडचण निर्माण झाली आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या नियमांचा अडथळा येऊ दिला जाणार नाही, असे स्पष्टीकरण पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी दिले आहे. प्रशासनाला तातडीने कामे सुरू करण्याचे निर्देश Ãदुष्काळी परिस्थितीची गांभीर्यपूर्वक दखल घेत ग्रामीण भागातील मजुरांना तात्काळ रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. या कठीण काळात सामान्य नागरिकांना रोजगारासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत आणि सर्वांना काम मिळेल याची पूर्ण काळजी घेतली जाईल. -विलास भुमरे, आमदार, पैठण तालुक्यात पावसाअभावी पिके करपली असून ग्रामीण भागातील लोकांचे आता ‘रोहयो’कडे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *