![]()
ज्ञान प्रबोधिनी, पुणे व एव्हीएन्ट कंपनी, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून उभारण्यात आलेल्या जलकुंभांपैकी शेनवड येथील शिवाची वाडी येथे १० हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले. एव्हीएन्ट कंपनीचे राजेश पवार, मनोज पाटील, ज्ञान प्रबोधिनीचे स्वामी देवसेवानंदजी, ग्रामसेविका सरला राठोड, सुरेश शीद यांच्यासह ग्रामस्थ व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.जलस्रोत उपलब्ध असतानाही पाणीसाठवण टाकीअभावी येथील महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी दूरवर जावे लागत होते. आता जलकुंभामुळे ही कसरत कमी होणार असल्याने ग्रामस्थांनी ज्ञान प्रबोधिनी व एव्हीएन्ट कंपनीचे आभार मानले.शेनवड, कुरुंगवाडी, धारगाव, सोमज यांसह विविध छोट्या वस्त्यांमध्ये अशा जलकुंभांची उभारणी करण्यात आली आहे.
Source link
शिवाची वाडीमध्ये 10 हजार लिटर क्षमतेचा उभारला जलकुंभ:ज्ञान प्रबोधिनी व एव्हीएन्ट कंपनीचापाणी टंचाई निवारणासाठी उपक्रम