Headlines

जिल्ह्यात दुष्काळामुळे 75 हजार घरकुलांची कामे ठप्प:39000 घरांचा श्रीगणेशाच नाही, पाणीटंचाई अन् बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने घरांचे स्वप्न अपूर्ण‎


.

पावसाने ओढ दिल्यामुळे शेतातील पिकापाठोपाठ आता ग्रामीण भागातील बेघरांच्या हक्काच्या घरांची बांधकामेही ठप्प झाली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (टप्पा-२) अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनेला दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. प्रशासनाकडून पहिला हप्ता जमा होऊनही पाण्याची तीव्र टंचाई आणि निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे जिल्ह्यातील तब्बल ७५,०९९ घरकुलांची कामे रखडली आहेत. सुमारे ३९ हजार लाभार्थींनी अजून प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशाच केलेला नाही. दुष्काळी परिस्थितीच्या या झळांमुळे पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील हजारो गरीब कुटुंबांवर चिंतेचे सावट पसरले आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने शेती पिकांसह अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. विहिरी आणि कूपनलिकांसह अन्य जलस्रोत आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठीच नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत बांधकामासाठी लागणारे पाणी उपलब्ध करणे आव्हान ठरत आहे. . एकूण मंजूर घरकुले: १,००,९८६ . पहिला हप्ता दिलेले लाभार्थी: १४,३२५ . दुसरा हप्ता दिलेले लाभार्थी: ५५,२३१ . तिसरा हप्ता दिलेले लाभार्थी: ४१,३०६ . चौथा हप्ता दिलेले लाभार्थी: ५,११६ . पूर्ण झालेली घरकुले: २५,८८७ (२५.६३ %) . अपूर्ण/रखडलेली घरकुले: ७५,०९९ घरकुल बांधकामाच्या प्रगतीमध्ये जिल्ह्यात तालुकानिहाय मोठी तफावत दिसून येत आहे. पंढरपूर तालुक्यात ३३.८० टक्के तर सांगोला तालुक्यात ३३.५३ टक्के काम पूर्ण झाले आहे. याउलट बार्शी (२०.६८%), माढा (२१.०७%), मोहोळ (२१.१७%) आणि दक्षिण सोलापूर (२१.३८%) या तालुक्यांमध्ये कामाची गती तुलनेने अत्यंत संथ आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ८,३७० अपूर्ण घरकुले अक्कलकोट तालुक्यात आहेत. योजनेअंतर्गत पहिला हप्ता जमा झाल्यानंतर काम सुरू होणे अपेक्षित असते, मात्र निधी उपलब्ध असूनही दुहेरी संकटामुळे कामाला गती नाही दुष्काळात पाणी कुठून आणायचे ^घरकुल बांधण्यासाठी पहिला हप्ता मिळाला आहे. मात्र बांधकामासाठी लागणारे पाणी कुठून आणायचे, हा मोठा प्रश्न आहे. गावातील विहिरीसह बोअरवेलमध्ये पाणी नाही . हरी भोसले, घरकुल लाभार्थी लोखंडासह मजुरीचे दर वाढले ^शासनाकडून मिळणारा निधी महत्त्वाचा आहे; पण सिमेंट, वाळू, लोखंडासह मजुरीचे दर वाढले आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे बांधकाम सुरू करणे कठीण आहे. – किसन लेंगरे, घरकुल लाभार्थी

बार्शी आणि माढा तालुक्यात संथ गती

पाणी प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत बांधकाम अर्धवट ^जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लाभार्थ्यांकडूनही घरकुल विलंबासाठी हेच मुख्य कारण सांगितले जात आहे. परिस्थिती प्रतिकूल असली, उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू चंद्रशेखर जगताप, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *