![]()
विक्रमी कामगिरी करीत अमरावतीची १७ वर्षीय महिला धनुर्धर कुमकुम मोहोडने आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला प्रथमच सांघिक, वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले. तिने मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकले. तिने तिन्ही क्रीडा प्रकारांत सहभाग घेत तीन पदकांच
.
वडील अनिल मोहोड यांनी कुमकुमने पदकांची भूक कायम ठेवण्यासाठी मोबाईल व झगमगाटापासून दूर राहावे, असे स्पष्ट केले आहे. तिच्या आईला कुमकुमने केलेल्या कामगिरीचे फारच कौतुक आहे. प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांनी सुवर्णकन्या कुमकुम मोबाईलपासून दूर असते, असे सांगितले. या खेळात एकाग्रता फारच आवश्यक आहे. यासाठी ती केवळ संगीत ऐकते, असे त्यांनी सांगितले. क्रीडा उपसंचालक अविनाश पुंड यांनी अमरावतीच्या मातीत देशाला सुवर्णपदक देणारी खेळाडू घडली, याचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगितले. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्चरी रेंज तयार केले. त्याचा फायदा आता देशाला दिसत आहे, असे सांगितले. कुमकुम या रेंजवर नियमित सराव करते, असे त्यांनी अभिमानाने सांगितले. क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने यांनी कुमकुम फारच साधी आहे, असे म्हटले. महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे यांनी खेळाडूंसाठी तयार केलेल्या कृती आराखड्याचे फळ आता मिळत आहे, असे सांगितले. सचिव प्रमोद चांदूरकर यांनी २०२८ चे ऑलिम्पिक हे आमचे मुख्य लक्ष्य आहे, असे सांगितले. त्याची पहिली पायरी कुमकुमने गाठली, असे त्यांनी म्हटले. रिकर्व्ह धनुर्विद्या प्रकारात देशाला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या कुमकुमने माझ्यासाठी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला फारसे महत्त्व नाही, असे सांगितले. मी धनुर्विद्या या माझ्या खेळातील यशातच नेहमी आनंद शोधत असते, असे ती म्हणाली. आपल्या कामगिरीने देशवासीयांना आनंद मिळावा, असा माझा नेहमीच प्रयत्न असतो, असे तिने सांगितले. तिने ही माहिती जपानच्या नागोया येथून फोनवर दिव्य मराठीशी बोलताना दिली. नवाथे चौक परिसरातील न्यू प्रभात कॉलनीत कुमकुम मोहोडच्या घरी तिच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करण्यासाठी शहरातील क्रीडाप्रेमींनी चांगलीच गर्दी केली होती. यात प्रामुख्याने खा. बळवंत वानखडे तसेच इतर मान्यवरांचा समावेश होता. शेजारी राहणारे नागरिक, कुमकुमच्या मैत्रिणी, कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक, शाळेतील विद्यार्थी यांनी कुमकुमच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांचे अभिनंदन केले.
खेळातील यशातच मी आनंद शोधते