![]()
देशात राष्ट्रपतींची निवडणूक होते तर मग निवडणूक आयुक्तांची निवडणूक का होत नाही नेमणूक कशी होते असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. त्या कमिटीमध्ये सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते होते. पण आता त्यामधून सरन्यायधीश काढून टाकत पंतप्रधान म्हणतील त
.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या देशाचा आणि आपल्या स्वातंत्र्याचा हा लढा आपण लढतो आहोत. मेक इन इंडियामध्ये जर हुकुमशहा तयार होणार असेल तर त्याला देशात गाडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र उभे राहिलो आहोत. राज्यात 2 कोटी मतदार वगळले गेले आहेत, तर देशात 13 कोटी मतदार वगळले गेले आहेत. हे तुम्हाला मान्य आहे का? तामिळनाडू, बंगालमध्ये मतदार वगळण्यात आले. त्यातील काही लोकांचे मते वैध ठरली. पण या मतदारांना पोटनिवडणुकीसाठी मतदान करता येणार आहेत का? हा विषय सुप्रीम कोर्टात आहेत.
हे ही वृत्त वाचा
निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार!:व्होटिंग मशीन बंद करा, महाराष्ट्रातील SIR रद्द झाला पाहिजे- राज ठाकरे
केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज काढण्यात येणाऱ्या महामोर्चाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. सकाळी 10 वाजता कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाल्यानंतर, साधारण 11 वाजता ‘मेट्रो सिनेमा ते महापालिका’ असा हा संयुक्त मोर्चा मार्गक्रमण करेल. या लक्षवेधी मोर्चामध्ये राज आणि उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाविरोधात कोणती भूमिका मांडतात आणि काय गर्जना करतात, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. वाचा सविस्तर