Headlines

सोशल मीडियाचे फायदे-तोटे अन् विद्यार्थ्यांचे रोखठोक विचार:फिरोदिया शाळेत‎वादविवाद स्पर्धेला‎ मिळाला प्रतिसाद‎




अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये हिंदी दिनाचे औचित्य साधून वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला शहरातील विविध विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेचे उद्घाटन स्व. अशोकभाऊ फिरोदिया व स्व. शांतीकुमार फिरोदिया यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे परीक्षक व प्रमुख पाहुणे डॉ. पूर्णिमा बेहेरे व रवींद्र चोभे, प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, माध्यमिक विभागप्रमुख वैशाली वाघ, उच्च प्राथमिक विभागप्रमुख रेखा शर्मा, प्राथमिक विभागप्रमुख अर्चना मुंडिवाले, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख ज्योती सुद्रिक उपस्थित होते. विद्यालयाच्या संगीत शिक्षिका रेणुका पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. प्राचार्य प्रभाकर भाबड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. हिंदी विषयाच्या अध्यापिका उन्नती नगरकर यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. डॉ. पूर्णिमा बेहेरे यांनी वादविवाद स्पर्धेत सहभागी होताना कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे, तसेच आपले विचार प्रभावीपणे कसे मांडावेत, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘सामाजिक माध्यम वेदिका विद्यालयीन छात्रों के लिए जरूरी है या नहीं?’ या विषयावर विविध विद्यालयांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. सामाजिक माध्यमांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्थान, त्याचे फायदे-तोटे, शैक्षणिक वापर तसेच त्यांचे संभाव्य दुष्परिणाम अशा विविध पैलूंवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धा संपल्यानंतर लगेचच पारितोषिक वितरण समारंभ घेण्यात आला. आसिफ शेख यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. विजेत्या विद्यार्थ्यांचे अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छाया फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, संस्थेचे सदस्य, प्राचार्य प्रभाकर भाबड यांनी अभिनंदन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *