Headlines

अपघात:एस टी बस- दुचाकी अपघातात एक जण ठार, एक जण जखमी




एस टी बस व दुचाकीच्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गोलवाडी फाट्याजवळ शनिवारी ३ ऑक्टोबरला घडली. पोलिसांच्या माहितीनुसार सुनील राठोड रा.गोलवाडी यांच्या तक्रारीनुसार शनिवारी गोलवाडी फाट्याजवळ फिर्यादीच्या शेताजवळ जेसीबीचे ड्रायव्हर धनवेश्वर राणा रा.झारखंड व फिर्यादीचे ट्रॅक्टर ड्रायव्हर गणेश जगताप रा. सवासनी हे दोघे गोलवाडी येथून मंगरुळपीरकडे फिर्यादीची दुचाकी क्र.एम एच ३७ ए ई ८५९७ ने जाताना फिर्यादीने आवाज दिल्याने ते थांबले व कडेला गप्पा करत होते. वाशीमकडून मंगरुळपीरकडे जाणारी एस टी बस क्र एम एच १४, एम टी ०२७१ च्या चालकाने दोघांना धडक देवून जखमी केले असता त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी गणेश डि. जगताप रा. सवासनी यास तपासून मृत घोषित केले. धनवेश्वर राणा जगदीश राणा रा डेबो, यास जिल्हा रुग्णालय येथे रेफर केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *