![]()
वैजापूर तालुक्यातील खंडाळागावानजीक कुलभूषणमहाविद्यालयासमोरवैजापूरकडे पोकलेनघेऊन जाणाऱ्या ट्रकचेसमोरील टायरफुटल्याने ट्रकचीदुचाकीला धडकबसली. यात एक जणठार तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. वैजापूर येथून शिऊर येथीलमहाविद्यालयात मुलीला घेऊन जातअसताना राष्ट्रीय महामार्ग ७५२ वरीलखंडाळा येथून जवळच असलेल्याकुलभूषण महाविद्यालयासमोर ट्रक(एमएच १६ ए इ ७६३९) चे टायरफुटल्याने ट्रकने दुचाकी (एमएच २० बीझेड ९२२१) ला जोरात धडक दिली.दुचाकीने शिऊर येथे जात असलेलेदत्तात्रय शांतीलाल महाले (४१) ठारझाले, तर मुलगी ऋतुजा महाले (१६)पायाला फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमीझाली. त्यांना बाळासाहेब जानराव वरिक्षाचालक अमीन शेख यांनी उपजिल्हारुग्णालय वैजापूर येथे दाखल केले. दत्तात्रेय महाले हे मुंबईहून ४ऑक्टोबर रोजी वैजापूर येथे भावाकडेआले होते. ५ ऑक्टोबर रोजी पितृपक्षअसल्याने ते वैजापूर येथे आले होते.मुलीला कॉलेजला सोडून येतो म्हणून तेशिऊरला मोटारसायकलवर निघालेहोते. खंडाळा गावाजवळ अपघातहोऊन दत्तात्रय महाले ठार झाले. मात्र,वैजापूर पोलिस स्टेशनला सायंकाळीउशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता. याघटनेमुळे महामार्गावरीलवाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हाऐरणीवर आला आहे. अपघातातपित्याचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातीलगावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Source link
दुचाकी अपघातात वडील ठार; मुलगी जखमी:खंडाळा येथील घटना, ट्रकचे टायर फुटल्याने दुचाकीवर जाणाऱ्या दोघांनाही चिरडले