![]()
एल निनोने महाराष्ट्रावर दुष्काळाचे ढग गडद केले आहेत. राज्यात यंदा १९% कमी पाऊस झाला असून धरणांमध्ये फक्त ७४% पाणीसाठा आहे. त्यामुळे सर्व मनपा, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, जलसंपदाने ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या उपलब्ध पाणीसाठ्याचे धरण आणि वापरनिहाय सविस्तर नियोजन केले आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. दरम्यान, दुष्काळ, पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना २५ लाखांपर्यंतच्या कामांना थेट मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत.२५ लाखांतून कोणती कामे होतील : जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या २५ लाख रुपयांतून तात्पुरत्या नळ योजना, पाईपलाईन व टाक्यांची दुरुस्ती, विहिरी खोलीकरण, गाळ काढणे, नवीन विंधन विहिरी व पुनरुज्जीवन, जनावरांसाठी बकेट, टब पुरवठा, गोशाळांत शेड, पाणी व्यवस्था. शाळांत जलशुद्धीकरण यंत्रणा, प्रा. आरोग्य केंद्र व अंगणवाड्यांना शुद्ध पाण्यासाठी साहित्य पुरवठा ही कामे होतील. लातूरच्या वडवळ नागनाथ गावात कुटुंबाला दिवसाला ५ घागरी पाणी लातूर | चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ गावात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. ग्रामपंचायतीच्या ३० बोअरपैकी तब्बल २४ बोअर आटल्याने बंद पडल्या आहेत. त्यामुळे उर्वरित केवळ सहा बोअरच्या पाण्यावर संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा सुरू ठेवण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला दररोज केवळ पाच घागरी पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. धरणांतील साठ्याचे काय? 1 प्रत्येक धरणात १०% अतिरिक्त आपत्कालीन बफर साठा असेल 2 बाष्पीभवन, गाळ व अनधिकृत उपसा विचारात घेऊन, पिण्यास आवश्यक पाणी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत राखीव ठेवले जाईल. 3 पिण्याचे पाणी, पशुधन आणि चाऱ्याची गरज भागवल्यानंतरच सिंचनासाठी पाणी. 4 धरणे, नद्या व कालव्यांतील अनधिकृत उपसा रोखण्यास जलसंपदा, महसूल, पोलिस विभागाची पथके गस्त घालून अवैध पंप, उपकरणे जप्त करतील. कुणाला कोणते निर्देश मनपा, नगरपालिका, ग्रा.पं.- पाणी गळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवा. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवा. प्रक्रिया केलेले सांडपाणी बागकाम, बांधकाम, धुलाई आदींसाठी वापरा. २. उद्योग – वापरल्या जाणाऱ्यापैकी किमान ३०% पाण्याचा पुनर्वापर किंवा पुनर्प्रक्रिया करा. अॅनालिसिस: फेब्रुवारीनंतर २० ते ३० टक्के होऊ शकते कपात तज्ज्ञांच्या मते, सध्या केवळ १० टक्के कपातीची घोषणा हा नागरिकांना ‘अलर्ट’ करण्याचा प्रयत्न आहे. गळती आणि पाण्याची चोरी हा मुख्य प्रश्न आहे. बहुतांश शहरात पाण्याची गळतीच ३०% च्या घरात आहे. त्यामुळे गळती रोखली तर कपातीची वेळच येणार नाही. परतीचा जोरदार पाऊस झाला नाही तर फेब्रुवारीनंतर कपात २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढवली जाऊ शकते.
Source link
राज्यात 10 टक्के पाणी कपात:एल निनोमुळे यंदा 19% कमी पाऊस, धरणांत फक्त 74% साठा, पुढील 8 महिने दुष्काळाशी लढण्यासाठी तयारी