केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (Special Intensive Revision – SIR 2026) मोहिमेवरून आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवरून विरोधी पक्षांनी रान उठवले असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीड
.
SIR 2026: मुख्यमंत्र्यांनी मांडली आकडेवारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत राज्यातील मतदार पुनरीक्षणाचे अधिकृत आकडे जाहीर केले. पुनरीक्षण मोहिमेपूर्वी महाराष्ट्राच्या आधारभूत यादीत 9 कोटी 78 लाखांहून अधिक मतदार होते. मात्र, 31 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत केवळ 7 कोटी 71 लाख मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
ASDD यादी प्रसिद्ध
ज्या मतदारांची गणना प्रपत्रे प्राप्त झाली नाहीत, त्यांची नावे वगळण्यात आली असून त्यांची ‘ASDD’ (Absent, Shifted, Dead, Duplicate – गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार) अशी स्वतंत्र यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नाव नोंदणीची संधी: वगळण्यात आलेल्या पात्र नागरिकांना प्रपत्र-६ (Form-6) आणि घोषणापत्राद्वारे पुन्हा नाव नोंदवण्याची संधी आहे. तसेच 1 ऑक्टोबर 2026 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही अर्ज करता येईल. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर किंवा ‘व्होटर सर्व्हिसेस पोर्टल’वर EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक किंवा मोबाईल क्रमांकावरून नाव तपासण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सन्नाटा का? राज ठाकरेंनी घेतला होता आक्षेप
मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणापूर्वी, 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला होता. या मोर्चात राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर थेट मतचोरीचा आरोप केला होता. “2024च्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले, तरी राज्यात कोणताही जल्लोष दिसला नाही; संपूर्ण सन्नाटा पसरला होता. कारण हा जनतेचा कौल नव्हताच! लोकसभा आणि विधानसभेच्या काळात अचानक 40 ते 60 लाख मतदार वाढवले गेले आणि एकूण 1 कोटी मतांची संशयास्पद वाढ झाली,” असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
SIR तत्काळ रद्द करा, बॅलेटवर निवडणुका घ्या
“मी 2017 पासून सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन सांगत होतो की देशात मतांची पद्धतशीर चोरी सुरू आहे. आता हा घोटाळा उघडा पडला आहे. महाराष्ट्रातील हा संशयास्पद एसआयआर तात्काळ रद्द करा आणि यापुढील निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्या, म्हणजे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल,” असा एल्गार राज ठाकरे यांनी पुकारला होता.
ज्ञानेश कुमारांविरोधात देशव्यापी असंतोष; विरोधक रस्त्यावर
केवळ ठाकरे बंधूच नव्हे, तर देशभरात निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात आक्रमक आंदोलने छेडली आहेत.
दिल्लीत ‘आप’ आणि काँग्रेस आक्रमक
राजधानी दिल्लीत आम आदमी पार्टी (AAP) आणि काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाबाहेर निदर्शने करत मतदार याद्यांमधील कथित फेरफार आणि केंद्रीकरणाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. एकीकडे विरोधक 2 कोटी मतदारांची नावे वगळण्यामागे षड्यंत्र असल्याचा दावा करत निवडणुकांवर बहिष्कार आणि बॅलेट पेपरची मागणी लावून धरत आहेत; तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस ही मोहीम बोगस व दुबार मतदारांना चाळण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मतदार यादीचा वाद आता संपूर्ण देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
————————————————–
हेही वाचा…
‘एका दिवसात महाराष्ट्र बंद नाही केला तर नाव बदलेन’:जरांगे पाटील आक्रमक, पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून सरकारला थेट इशारा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. तसेच सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. येथे वाचा संपूर्ण बातमी