Headlines

दिव्य मराठी फोटो इन्व्हेस्टिगेशन:जोडरस्त्यांसाठी जमीन खरेदी न करताच 20 कोटींचा पूल उभारला; परभणीत घरे, कब्रस्तानासमोर पूल परिणाम : 25 गावांना 40 किमी फेरा




पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे गावालगत गोदावरी नदीवर २०२० मध्ये पुलाचे बांधकाम सुरू झाले. या कामावर २० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, पूल उभारण्यापूर्वी जोडरस्त्यांसाठी जमीन अधिग्रहण केले नाही. प्रशासनाच्या चुकीमुळे घरे, प्लॉट व कब्रस्तानसमोर पुलाची उभारणी झाली. त्यामुळे जोडरस्त्याला जागा देण्यास स्थानिकांनी नकार दिला. नदीला पूर आल्यानंतर २.५ लाख ग्रामस्थांना फेरा गोदावरी नदीला पूर आल्यास नवीन पुलाशेजारी असलेला कमी उंचीचा जुना पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे पालम आणि पूर्णा तालुक्यातील सुमारे २५ गावांमधील अडीच लाख नागरिकांचा रहदारीचा प्रश्न निर्माण होतो. नागरिकांना पावसाळ्यात ४० किमी फेऱ्याने जावे लागते. नवीन पुलासमोर कब्रस्तान, त्यामुळे अधिग्रहण रखडले पुलास लागून कब्रस्तान असून त्या जागेचा शासकीय मोबदला केवळ ३ लाख ५० हजार रुपये आहे. त्या बदल्यात अन्यत्र कब्रस्तानासाठी जमीन घेणे शक्य नसल्याने जागा देण्यास समाजाचा विरोध आहे. जागेच्या बदल्यात इतरत्र जागा देण्याची मागणी केली आहे. थेट प्रश्न: संजयकुमार देशपांडे, उपविभागीय बांधकाम अभियंता, पूर्णा जमीन अधिग्रहणाची अडचण पुलाच्या कामात चूक कुणाची ?
– पूर्णा सार्वजनिक बांधकाम उपविभागाने पूल उभारला. काम योग्य असल्याचा त्यांचा दावा आहे. जमीन अधिग्रहित केली होती का?
– नाही, जोडरस्त्यांसाठी जमीन अधिग्रहण बाकी होते, ते सुरू आहे. पुलाच्या कामाचे पुढे काय होणार?
– लवकरात लवकर काम पूर्ण करू.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *