![]()
खुल्लोड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व संचालक उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. या विजयाबद्दल गोळेगाव येथील भाजपा कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष तथा सिल्लोड-सोयगाव विधानसभा क्षेत्राचे नेते सुरेश बनकर यांनी सर्व विजयी संचालकांचे अभिनंदन केले. या निवडणुकीत बाळासाहेब वाघ, द्वारकाबाई वाघ, यमुनाबाई भोरकडे, रघुनाथ नागरे, नारायण मोकासे, रमेश वाघ, गजानन सनान्से, आसाराम वाघ, भगवान भागवत, अलकाबाई वाघ, शेवंताबाई वाघ, बाळासाहेब वाघ आणि सिद्धार्थ सुरडकर यांनी विजय मिळवला. यावेळी उपस्थित नेत्यांनी सहकार क्षेत्रात पारदर्शक कारभार करणे, सभासदांचे हित जपणे आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत सोसायटीच्या माध्यमातून अधिक प्रभावी काम करण्याचे आवाहन विजयी संचालकांना केले. या सत्कार सोहळ्याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल वानखेडे, गोळेगावचे सरपंच गणेश बनकर, उपसरपंच अनिल बनकर, विजय वाघ, महेंद्र सुरडकर, ऋषिकेश वाघ आणि आजिम पेंटर यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
खुल्लोडच्या सोसायटीमध्ये भाजपचे वर्चस्व:गोळेगावला भाजप कार्यालयात सुरेश बनकर यांच्या हस्ते उमेदवारांचा गौरव