Headlines

कळवण तालुक्यात रस्ते खड्ड्यांत:रोटरी क्लबनेच घ्यावी दुरूस्ती हाती




रोटरी क्लबचे सचिव नितीन संचेती यांना पत्र प्रतिनिधी | कळवण तालुक्यातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक, शाळकरी मुले, प्रवासी व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. वारंवार तोंडी व लेखी निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ कळवणने पुढाकार घेऊन रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य शैलेश पवार यांनी केली आहे. तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. या गंभीर परिस्थितीबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार तोंडी व लेखी निवेदने देऊनही प्रशासनाला रोटरी क्लबचे सचिव नितीन संचेती यांना पत्र देताना शैलेश पवार. दुसऱ्या छायाचित्रात अभोणा नांदुरी रस्त्याची झालेली दुरवस्था. जाग आलेली नसल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शासकीय यंत्रणा आणि बांधकाम खात्याची अनास्था पाहता, जनतेच्या सुरक्षेसाठी सामाजिक संस्थांनीच मैदानात उतरण्याची वेळ आली असल्याचे शैलेश पवार यांनी म्हटले आहे. ‘रोटरी क्लब ऑफ कळवण’ या सामाजिक संस्थेने नेहमीच लोकहिताचे व समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. त्यामुळे जनतेच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर रोटरी क्लबने तातडीने मार्ग काढून खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, असे आवाहन त्यांनी रोटरी क्लबचे सचिव नितीन संचेती यांची भेट घेऊन पत्राद्वारे केले आहे. या सामाजिक हस्तक्षेपामुळे निष्क्रिय प्रशासनाला आपल्या जबाबदारीची जाणीव होईल आणि ढिसाळ कारभाराला चपराक बसेल, अशी आशाही शैलेश पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे. कळवण तालुक्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लब काय पावले उचलतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तालुक्यातील कळवण-अभोणा, नांदुरी-अभोणा, अभोणा-कनाशी, कळवण-रोकडोबा-कनाशी-हातगड, अभोणा-चणकापूर-बोरगाव, कळवण-ओतूर-मुळाने, कळवण-बेज-भादवन-विसापूर-पिळकोस, कळवण-रवळजी-देसराणे, कनाशी-जयदर-पुनद आदी प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *