![]()
मराठवाड्यासह पैठण तालुक्यात यंदा पावसाच्याओढीमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीअसून, शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातातून गेलाआहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणिरब्बी हंगामाला आधार देण्यासाठी जायकवाडीधरणातून रब्बीच्या पिकांसाठी ३ वेळा पाण्याचीआवर्तने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सध्या धरणात ७८.४८ टक्के साठा असून,पाणीवाटपाचे अंतिम नियोजन १५ऑक्टोबरदरम्यान पूर्ण केले जाईल, अशी माहितीपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेशहासे यांनी दिली. या निर्णयामुळे मराठवाड्यातील३८६ गावांतील १ लाख ८३ हजार ३२२ हेक्टरक्षेत्राला थेट सिंचनाचा फायदा मिळणार आहे. सध्या टंचाईमुळे जायकवाडीच्या दोन्ही मुख्यकालव्यांमधील पाणी बंद करण्यात आले आहे.मात्र, दिलासादायक बाब म्हणजे जायकवाडीधरण गेल्या सलग पाच वर्षांपासून पूर्ण क्षमतेनेभरलेले असल्याने धरणात पुरेसा जलसाठाउपलब्ध आहे. १५ ऑक्टोबरनंतर पाणी सोडण्याच्या तारखांवर निर्णय पाणीवाटपाचे अंतिम नियोजन १५ऑक्टोबरदरम्यान पूर्ण केले जाईल. पाणीकधी सोडणार याच्या तारखा निश्चितकेल्या जाणार आहेत. दरम्यान, रब्बीपिकांना वेळेवर पाणी मिळाले पाहिजे,अशी मागणी शेतकरी दीपक मोरे वकिशोर तांगडे यांनी केली. उन्हाळी पाणीपाळ्यांचा निर्णय झालेला नाही. पाणी नियोजनासाठी अधिकाऱ्यांना सूचना रब्बीच्या तीन पाणीपाळ्यांसाठी पाण्याचा साठावापरला जाणार आहे. यामुळेगव्हाच्या आणि ज्वारीच्यापिकांना वेळेवर सिंचनमिळून पिकांचे उत्पादनचांगले येण्यास मदत होईल.पाटबंधारे विभागाने यासंदर्भात काटेकोर नियोजनकरावे, उन्हाळ्यातपिण्याच्या पाण्याचा प्रश्ननिर्माण होऊ नये म्हणूनविशेष बैठक घेऊन संयुक्तनियोजन केले जाणार आहे.- विलास भुमरे, आमदार,पैठण तीन आवर्तनांमधून १८ टीएमसीपाणीसाठा वापरला जाणार परभणी १८२ गावांतील ९७,४४०, बीड ९३गावांतील ३८,६२०, जालना ७७ गावे३६,५८०, संभाजीनगर जिल्ह्यातील २८गावांतील ९,०५२ तर अहिल्यानगरजिल्ह्यातील ६ गावांतील १,६९० अशाएकूण ३८६ गावांतील १,८३,३२२ हेक्टरलासिंचन लाभ मिळेल. त्यामुळे रब्बी हंगामातशेतकऱ्यांचा फायदा होईल.
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:दुष्काळाने खरीप वाया; रब्बीसाठीजायकवाडी धरणातून तीन आवर्तने, संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, अहिल्यानगर या जिल्ह्यांना फायदा