![]()
पंचायत समितीची मासिक सभा पाणीटंचाई, चारा छावण्यांसारख्या गंभीर प्रश्नांवरून गाजली. सभेमध्ये उद्धवसेनेचे सदस्य दत्तात्रय वर्पे यांनी ‘आम्हाला विरोधी पक्षनेतेपद आणि केबिन द्या,’ अशी मागणी केली. यावर शिवसेना खासदार भुमरे गटाचे अनुराग शिंदे यांनी, ‘आमचे सदस्य जास्त असून आम्हाला विरोधी पक्षनेतेपद आणि केबिन द्यावे,’ ही मागणी केली. सभापती गायकवाड यांनी, तुम्ही आमच्यासोबत सत्तेत असल्याने तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद कसे द्यायचे, असा प्रश्न केला. त्यावर, ‘आम्ही पालकमंत्री गटाच्या उपसभापतींना मानत नाही,’ असे सदस्य शिंदे यांनी म्हटल्याने उपसभापती बाळासाहेब गाढे यांनी आक्षेप घेतल्याने शिवसेनेच्याच दोन गटांमधील वाद चव्हाट्यावर आला.पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी सभापती कल्याण गायकवाड यांच्या अध्यक्षतेत पार पडली. या वेळी गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके यांच्यासह सर्व सदस्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सत्तेत सोबत, विरोधी पक्षनेतेपद कसे देणार? सभागृहात शिवसेनेच्या काही सदस्यांनी घातलेला राडा सयुक्तिक नाही. आमच्यासोबत ते सत्तेत असल्याने त्यांना विरोधी पक्षनेतेपद कसे देणार? दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने सदस्यांनी त्यावर चर्चा करायला हवी. – कल्याण गायकवाड, सभापती व्हिडिओ कॉलवरून तपासले लोकेशन तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षक वेळेवर येत नाही, ग्रामसेवक गावात नसतात, असा आरोप सदस्य शेखर दांडगे यांनी केला. यावरून सभापतींनी चार विभागप्रमुखांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. शहानिशा करण्यासाठी एका ग्रामसेवकाला थेट व्हिडिओ कॉल लावून खुलासा मागितला असता तो ग्रामसेवक गावात हजर नसल्याचे समोर आले. यापूर्वीदेखील २२ कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता कापला आहे. यापुढे कुणी अनुपस्थित राहत असेल तर त्याचा घरभाडे भत्ता कापण्यात येईल, असा इशारा सभापती गायकवाड यांनी दिला.
Source link
छत्रपती संभाजीनगरात पालकमंत्री, खासदारांच्या गटांत पं. स.मध्ये जुंपली:विरोधी पक्षनेतेपदावरून शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर