Headlines

नोकरी वाचवण्यासाठी शिक्षकच करतायत विद्यार्थ्यांची ‘खरेदी’:शाळेतील बोगस प्रवेशासाठी ‘दिव्य मराठी’ने विकत घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी




नोकरी वाचवण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थी प्रवेशाचा अक्षरश: बाजार मांडला आहे. पटसंख्या दाखवणे अन् संचमान्यतेसाठी हा प्रकार सुरू आहे. ‘दिव्य मराठी’ने केलेल्या स्टिंगमधून अनुदानित शाळांच्या शिक्षकांचे उपद्व्याप उघड केले आहेत. एका विद्यार्थ्याची 3 हजारांत सौदेबाजी केली जाते. रिपोर्टरने स्वत: शिक्षक बनून हा घोटाळा चव्हाट्यावर आणला. 3 विद्यार्थ्यांना 7 हजारांत विकत घेतले. धक्कादायक म्हणजे विद्यार्थी उत्तराखंडचे निघाले. त्यांचा प्रवेश बीडमधील शाळेत अन् हजेरी मात्र छत्रपती संभाजीनगरच्या शाळेत आहे. यात एक आंतरराज्य टोळी सक्रिय आहे. इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सौदेबाजीसाठी उत्तराखंड अन् महाराष्ट्रात दलाल सक्रिय असल्याची बाब आता समोर आली आहे. नव्या निर्णयामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांचेही नुकसान मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम-2009 नुसार काढलेल्या 15 मार्च 2024 रोजीच्या जीआरनुसार 30 विद्यार्थ्यांना 1 शिक्षकपद मंजूर आहे. 2010 पूर्वी शेवटच्या तुकडीला विद्यार्थी संख्येचा निकष नव्हता. तोच निर्णय कायम ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही यात नुकसान आहे-प्रतलकुमार सुरदुसे, निवृत्त शिक्षणाधिकारी अशी केली शिक्षकरूपी दलालाने सौदेबाजी ‘यू-डायस’ पडताळणीची अखेरची मुदत 30 सप्टेंबर होती. त्यामुळे रिपोर्टरने भालगाव येथील एका शाळेच्या शिक्षकाशी संवाद साधला. सुरुवातीला रिपोर्टरने दहा विद्यार्थी हवे असल्याचे म्हटले, पण दलालाने फक्त 3 विद्यार्थ्यांचे पीईएन क्रमांक (पेन) आणि जन्मतारखा दिल्या. त्यासाठी प्रतिविद्यार्थी रु. 2500 मागितले, पण 7 हजारांत 3 विद्यार्थी देण्याची दर्शवली. पैसे स्वत:ऐवजी हॉटेलच्या QR कोडवरून घेतले. पैसे मिळताच विद्यार्थ्यांची जन्मतारीख, पेन नंबर पाठवले. व्हेरिफिकेशन केले तर विद्यार्थी उत्तराखंडचे निघाले. यंदा बीडच्या शाळेत प्रवेश आहे. मागील वर्षी याच 3 पैकी 2 विद्यार्थी रेकॉर्डवर कल्याण पूर्वच्या शाळेत होते, तर 1 जोगेश्वरी पश्चिमधील शाळेत होता. 10 हजार शिक्षक होतील जास्त एकट्या छत्रपती संभाजीनगरात मागील वर्षी 600 हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यात जिल्हा परिषद शाळेतील 500 अन् खासगी अनुदानितचे 150 शिक्षक होते. यंदा संपूर्ण राज्यात 10 हजार शिक्षक अतिरिक्त ठरू शकतात. त्यामुळे अशा प्रकारची सौदेबाजी महाराष्ट्रात सुरू आहे.
रेट फिक्स असतात, नाशिकलाही आम्ही दरवर्षी विद्यार्थी देत असतो दलाल 1 रिपोर्टर : 10 विद्यार्थी हवे आहेत.
दलाल : एकाचे अडीच हजार लागतील. रात्री U-DISE नंबर घेऊन या. मग मी यादी देतो. तुम्ही स्वत: व्हेरिफाय करून पाहा. आम्ही हमीसुद्धा घेतो. दलाल 2 रिपोर्टर: मला 6 विद्यार्थी हवेत.
दलाल : व्हेरिफिकेशन करून देण्यासह 3 हजार घेतो. तुमचे काम झाले की हेच प्रवेश दुसऱ्या शाळेला परत द्यावे लागतात. काम होऊन जाईल. ‘आमच्या शाळेत असे बनावट विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत. असे काही असेल तर मला चौकशी करावी लागेल. रेकॉर्ड तपासावे लागेल, तरच सांगू शकेन,’ असे ‘चंपावती’चे मुख्याध्यापक सारंग जोशी यांनी सांगितले. इयत्ता दुसरीसाठी सौदा, मुले निघाली पहिलीची तिन्हींची पडताळणी केली तर ते उत्तराखंडचे विद्यार्थी निघाले. धक्कादायक म्हणजे तिघांचाही बीड जिल्ह्यातील चंपावती प्राथमिक विद्यालयाच्या (U-DISE क्र. 27271200501) इयत्ता पहिलीत प्रवेश दिसून आला. विक्रीच्या वेळी विद्यार्थी दुसऱ्या वर्गातील असल्याचे सांगितले, सिस्टिममध्ये ते पहिलीचेच होते. थेट सवाल तक्रारीनंतर कारवाई करू के. जी. दातखीळ, शिक्षण उपसंचालक संचमान्यतेसाठी प्रवेश विकत घेताहेत, तुम्ही काय कारवाई करणार? 30 सप्टेंबरलाच प्रक्रिया संपली. आता मुदत संपलीय. तरीही कुणाची तक्रार आलीच तर कारवाई करू. हेच विद्यार्थी देशभर फिरताहेत… आमचा पोर्टलवर वॉच असतो. कुणी असे करू शकणार नाही. पण केलेच तर दोषींवर कारवाई करू.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *