![]()
इंदूर-पुणे महामार्गावरील कॅम्प परिसरात संत बार्णबा शाळेसमोर महामार्ग ओलांडताना भरधाव ट्रकखाली चिरडून युवतीचा मृत्यू झाला. बुधवारी हा अपघात घडला. कोमल संतोष पगारे (१९, रा. मेसणखेडे खुर्द, ता. चांदवड) असे मृत युवतीचे नाव आहे. या अपघातात आठ वर्षांचा बालक गंभीर जखमी झाला. ट्रक (यूपी २५ एफटी २२४९) पुण्याकडून मालेगावच्या दिशेने जात होता. त्याचवेळी कोमल रस्ता ओलांडत असताना तिच्या बाजूला कंटेनर असल्याने तिला वाचवण्यासाठी ट्रकचालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, महामार्गाच्या मध्यभागी असलेला दुभाजक, वाहनाचा वेग आणि रस्त्यावरील परिस्थिती यामुळे ट्रकवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. त्यामुळे कोमल पगारे ट्रकखाली येऊन सुमारे ५० ते ६० फूटावर फरफटत गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. कोमल ही दत्ताचे शिंगवे येथील रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबातील होती. कामानिमित्त ती मनमाड येथे आली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Source link
महामार्ग ओलांडताना ट्रकखाली चिरडून तरूणी ठार:मनमाड कॅम्प परिसरातील संत बार्णबा शाळेसमोर अपघात; छाेटा मुलगा गंभीर