![]()
कोरोना काळातील 22 मृत रुग्णांवर 6 वर्षांनंतर उपचार केल्याचे दाखवून खोटे क्लेम करीत नाशिकमधील तीन रुग्णालयांनी सुमारे 2 कोटी रुपये लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या रुग्णांनी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य (जीवनदायी) आणि आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. याप्रकरणी वरळी पोलिसांत तिन्ही रुग्णालयांच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूरचे शिव मल्टिस्पेशालिटी, गंगापूर रोडवरील ऋषिकेश आणि सिडकोतील नाशिक ग्रेस हॉस्पिटलने राज्य शासनाकडून विविध योजनांमार्फत गरीब रुग्णांना मिळणारा लाभ स्वत:च्या घशात घालण्यासाठी 22 मृत रुग्णांवर कागदावर उपचार दाखवले. या घोटाळ्याची दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव चंद्रकांत विभुते यांनी मुंबईतील वरळी पोलिस ठाण्यात तिन्ही रुग्णालयांच्या संचालक आणि प्रशासकांविरोधात 1 कोटी 79 लाख 42 हजारांच्या फसवणूकप्रकरणी फिर्याद दिली. यानंतर गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. यातील एका रुग्णालयाच्या संचालकाचा अटकपूर्व जामीनही न्यायालयाने फेटाळला आहे. तब्बल 392 प्रकरणे खोटी 5 लाखांपेक्षा जास्त रकमेचे दावे एकाच मोबाइल नंबरवरून नोंदवले नाशिकची रुग्णालये, पण गुन्हा मुंबईत का? राज्य आरोग्य हमी सोसायटी आणि रुग्णालयांमध्ये करार असतो. त्यातील कलम 32(4)च्या अटीनुसार कायदेशीर कारवाईचे अधिकार क्षेत्र मुंबई न्यायालयाचे आहे. त्यामुळे नाशकात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार केल्यानंतरही वरळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या मृत रुग्णांचा डेटा वापरून घेतला योजनेचा लाभ भिका बागूल, (माळवाडी, ता. देवळा- मृत्यू : 17-01-2021) रामदास अहिरे (सटवाईवाडी, मृत्यू : 5-5-21) श्रावण कापसे (देवळा, मृत्यू : 10-5-22) भौरव वालीनकर (कळवण, 29-7-21) काळू पवार (हतगड, 20-12-20), याशिवाय जिल्ह्यातील अन्य 17 रुग्णांचा डाटा रुग्णालयांनी वापरला आहे. आयुष्मान भारत योजनेत घोटाळा आ. डॉ. राहुल आहेर यांनी विधिमंडळात हा प्रश्न मांडला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशान्वये विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन झाली. स्वतंत्र तपास सुरू झाल्याने आता आणखी काही बड्या हॉस्पिटलचे संचालक व शासकीय यंत्रणेतील हस्तक उघडकीस येणार आहेत.
361 प्रकरणांत देवळा, कळवण, दिंडोरी तालुक्यातील रुग्णांनी प्रत्यक्षात दुसऱ्याच रुग्णालयात उपचार घेतले. 392 प्रकरणे खोटी आढळली समितीचा प्राथमिक चौकशी अहवाल
Source link
दिव्य मराठी एक्स्पोज:कोरोनाच्या 22 मृतांवर 6 वर्षांनी उपचार दाखवून लाटले 2 कोटी, नाशिकच्या 3 हॉस्पिटलचा प्रताप