Headlines

वडवणीची घटना:सिमेंट मिक्सरमध्ये पडल्यामुळे‎ 16 वर्षीय बालकामगार ठार‎, कामगार पळून गेल्याने मृतदेह मशीनमध्ये ७ तास अडकला‎




वडवणी तालुक्यातील रुई पिंपळ्यातील सोना फाटा ते‎ खडकी रस्त्यावर असलेल्या बाळराजे कन्स्ट्रक्शनच्या ‎‎सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय ‎‎बाल कामगाराचा मृत्यू झाला. ही‎‎ घटना गुरुवारी दुपारी २ वाजता ‎‎घडली. घटना घडताच प्लँटवरील सर्व कर्मचारी पळून गेले. त्यामुळे‎‎ मृतदेह मिक्सरमध्ये ७ तास‎‎ मशीनमध्ये अडकून पडला होता.‎ ‎सोन्नाखोट्टा ते देवळा या‎रस्त्याच्या कामासाठी रुई (पिंपळा) येथे आर.एम.सी.‎प्लँट उभारला आहे. अमोल मच्छिंद्र जावळे (१६, रा.‎खंडोबाचीवाडी, खडकी, ता. वडवणी) हा ‎बालकामगार या प्लांटमध्ये कामाला होता. गुरुवारी‎ दुपारी अचानक अमोल मिक्सरमध्ये पडल्याने त्याचा‎ जागीच मृत्यू झाला. घटना घडताच प्लांटवरील सर्व ‎कर्मचारी पळून गेले. त्यामुळे घटना उशिरा समोर‎ आली. मिक्सरचा ऑपरेटरही नसल्याने ७ तास मृतदेह‎ अडकून राहिला. सायंकाळी उशिरा तो बाहेर‎ काढण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच‎ वडवणी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक‎ वर्षा व्हगाडे, पोलिस उपनिरीक्षक शाम गायकवाड,‎पोलिस अंमलदार हनुमंत कप्पे, सहाय्यक पोलिस ‎उपनिरीक्षक नवनाथ उगलमुगले, सहाय्यक फौजदार‎ आदिनाथ तांदळे, पोलिस हवालदार भास्कर राऊत,‎पोलिस अंमलदार आमेर सय्यद, विश्वजित मुंडे‎ यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोषींवर ‎कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.‎ गंभीर दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित‎ मृतदेह स्वीकारण्यास नातेवाइकांचा नकार‎ दुपारी दोन वाजता घडलेल्या घटनेनंतर मृतदेह मिक्सरमध्ये‎ अडकून पडलेला होता. तो रात्री ९ वाजता बाहेर काढला.‎ पोलिस पंचनामा आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह‎ नातेवाईकांकडे देण्यात आला . मात्र संबंधितांवर गुन्हा‎ दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार‎ नातेवाईकांनी दिला. उशिरापर्यंत मृतदेह स्वीकारला नव्हता.‎ वाहनांची वर्दळ वाढल्याने ‎दुर्घटनेचे बिंग फुटले‎ घटना घडल्यानंतर प्लँटवरील काही ‎कामगार घटनास्थळावरून पसार ‎झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.‎दरम्यान, काही वाहनांची घाईघाईने ‎ये-जा सुरू असल्याचे नागरिकांच्या ‎निदर्शनास आले. त्यामुळे संशय‎ आल्याने नागरिकांनी प्लँटकडे धाव‎ घेतली. तेथे ही दुर्घटना घडल्याचे ‎समोर आले.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *