![]()
दुष्काळामुळे गावात रोजगाराची गरज वाढत असून, संकट दारात उभे असतानाही प्रशासनाने रोहयोची तयारी कागदावरच केली असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याचा ग्रामपंचायतनिहाय हिशेब तपासला असता ८७६ पैकी अवघ्या ६१ ग्रामपंचायतींत काम सुरू, तर ८१५ ठिकाणी एकही काम नसल्याचे उघड झाले. म्हणजे १०० ग्रामपंचायतींपैकी ९३ ठिकाणी मजुरांसाठी कामच नाही. केवळ ६१ ग्रामपंचायतींतच केंद्रित असल्याचे स्पष्ट झाले. त्याहून गंभीर म्हणजे ६२४ पैकी ५६७ कामे गंगापूर, पैठण आणि वैजापूर या तीन तालुक्यांत; उर्वरित सहा तालुक्यांत मिळून अवघी ५७. म्हणजे प्रत्येक १० पैकी ९ कामे तीन तालुक्यांतच. खुलताबाद आणि फुलंब्री तर थेट शून्यावर आहेत. दुष्काळी गावांसाठी नियोजन करणार Ãजुनी मनरेगा जूनमध्ये बंद होऊन नवीन योजना लागू झाल्याने संक्रमण प्रक्रिया सुरू आहे. ३७६ प्रकारची कामे असून नियमावली अंतिम टप्प्यात आहे. डिजिटल हजेरीतील सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे संख्या कमी दिसत आहे. जिल्हाधिकारी व सीईओंच्या सूचनेनंतर दुष्काळी गावांसाठी तातडीने नव्याने नियोजन केले जाईल. – अविनाश गलांडे, जि.प. अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर खुलताबाद ४०, फुलंब्रीच्या ७२ ग्रा.पं.मध्ये काम नाही गंगापूर ११३ पैकी २१ ग्रामपंचायतींत २७६ कामे, पैठण ११० पैकी १२ ठिकाणी १६३, वैजापूर १३५ पैकी १२ ठिकाणी १२८, तर संभाजीनगर ११६ पैकी ११ ठिकाणी ३१ कामे सुरू आहेत. सिल्लोडमध्ये १०५ पैकी २ ठिकाणी १८ कामे सुरू आहेत.
Source link
815 ग्रामपंचायती कामाविना:876 पैकी 61 ग्रा.पं.मध्ये रोहयोची कामे सुरू, जुनी मनरेगा बंद, ‘व्हीबी-जी राम जी’ सुरू