![]()
रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना व पर्यायी व्यवस्था न करता नांदगाव अंडरपास दुरुस्तीसाठी बंद केल्याने शहरातील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. हे काम १० ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, सर्व वाहतूक नदीपात्रातील रेल्वे पुला खालून वळवण्यात आली आहे. मात्र, हा रस्ता अरुंद आणि खड्डेमय असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना पुलाखालून वाट काढताना कसरत करावी लागते. येथे अपघात होण्याची शक्यता असून, मोठा अनर्थही घडू शकतो. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनी रेल्वे स्टेशन अधीक्षकांना निवेदन दिले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास शनिवारी (दि. १०) रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्याधिकारी, तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनानंतर रेल्वे अभियंता भुपेंद्र पाटील आणि इतर अधिकाऱ्यांनी अंडरपासची पाहणी करून ठेकेदाराला काम वेळेत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Source link
नांदगाव रेल्वे अंडरपास दुरुस्ती संथ; सेनेचा रेल रोकोचा इशारा