Headlines

Ravindra Chavan Targets Rahul Gandhi Over Congress Double Standards


सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण! ज्या राज्यांमध्ये तब्बल 40-40 वर्षे काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री होऊ शकला नाही, तिथे त्यांच्याच मित्रपक्षांची सत्ता होती. मात्र, व्होट चोरीचा आरोप करणारे राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते या वास्तवावर त

.

दरम्यान मतदार याद्यांमधील कथित घोळ, मतदार पुनर्पडताळणीची ‘एसआयआर’ प्रक्रिया आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीतील संसदेपासून रस्त्यांपर्यंत रान उठवले असतानाच रविंद्र चव्हाण यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या राजकारणाचे रंग सोयीनुसार बदलले, तरी संसदेतील अधिकृत रेकॉर्ड बदलत नाहीत,” असा घणाघाती टोला लगावत फडणवीस यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातील हवाच काढून घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केलेल्या कपिल सिब्बलांच्या व्हिडिओनंतर चव्हाणांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

अमित शहांच्या व्हिडिओत काय?

कोलकाता येथील बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशभरातील विविध राज्यांमध्ये किती दशकांपासून काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री झालेला नाही, याचा सविस्तर पाढा वाचला. काँग्रेसने सततच्या पराभवानंतर आत्मचिंतन करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी पक्षाचे नेतृत्व करत असल्यापासून देशातील नागरिक वेळोवेळी त्यांच्या विरोधात कौल देत आहेत, आणि आता राहुल यांच्याच नेतृत्वात ‘इंडिया आघाडी’ पुन्हा एकदा मोडकळीस येऊ लागली आहे, असा टोला अमित शहा यांनी लगावलाचा व्हिडिओ चव्हाणांनी पोस्ट केला आहे.

कपिल सिब्बल यांच्या व्हिडिओतील वक्तव्य काय?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेअर केलेल्या अधिकृत संसदीय कामकाजाच्या व्हिडिओत तत्कालीन कायदामंत्री कपिल सिब्बल एसआयआर आणि मतदार वगळणीच्या नियमांवर संसदेत स्पष्टीकरण देताना दिसत आहेत.

हेही वाचा…

सलग तिसऱ्या दिवशी निदर्शने; राहुल, प्रियंका असे केव्हापर्यंत करणार: जाणून घ्या विरोधकांची रणनीती; ज्ञानेश कुमार प्रकरणी पुढे काय होणार

6 ऑक्टोबर 2026 ची सकाळ. राहुल गांधी विरोधी खासदारांसोबत निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चा काढत होते. पोलिसांनी अडवले, तेव्हा त्यांनी आकाशवाणी भवनात ठिय्या दिला. 8 तासांनंतर पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतले आणि मध्यरात्री उशिरा सोडून दिले. 7 ऑक्टोबर 2026 ची दुपार. राहुल गांधी यांनी कनॉट प्लेसमधील एका रेस्टॉरंटमध्ये विरोधी खासदारांसोबत दुपारचे जेवण घेतले. त्यानंतर जंतर-मंतरवर धरणे देण्यासाठी निघाले. पोलिसांनी अडवले, तेव्हा ते रस्त्यावर बसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि 2 तासांनंतर सोडून दिले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.