Headlines

जागतिक मानसिक आरोग्य दिन:संभाजीगर शहराची डिप्रेशन लेव्हल 7 टक्क्यांनी वाढली; दर महिन्याला 15000 रुग्णांवर उपचार




बदलती जीवनशैली, करिअरची जीवघेणी स्पर्धा आणि मनातील विचार जवळच्यांशी न बोलता आतल्या आत दाबून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे शहरातील नैराश्याच्या पातळीचे प्रमाण ७ टक्क्यांनी वाढले आहे. ३० वर्षांपूर्वी हे प्रमाण नगण्य होते. सद्य:स्थितीत दर महिन्याला किमान १५ हजार जणांना उपचार घ्यावे लागत आहेत. गेल्या तीन दशकांतील स्थिती पाहता शहरात मानसोपचारतज्ज्ञांची संख्या अवघ्या २ वरून ६० पेक्षा जास्त झाली आहे, तरीही ओपीडीमधील रुग्णांची गर्दी ओसरलेली नाही. जीवनशैलीत सकारात्मक बदल करा डिप्रेशनचे प्रमाण वेगाने वाढले आहे. मन शांत ठेवण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे. आम्ही स्वत: रोज किमान नव्या १५० रुग्णांची तपासणी करतो. -डॉ. मेराज कादरी, मानसोपचारतज्ज्ञ, संभाजीनगर. मनाला आजार झाल्यास उपचार घ्या विविध अभ्यासांतून डिप्रेशन वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्याप्रमाणे शारीरिक व्याधी झाल्यानंतर आपण तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतो, अगदी त्याचप्रमाणे मनाला आजार झाल्यास उपचार घेणे आवश्यक आहे. -डॉ. संदीप सिसोदे, मानसशास्त्रज्ञ, संभाजीनगर. मानसिक आजाराला कलंक मानणे सोडा इतर आजारातून बरे झाल्यावर समाज आनंद व्यक्त करतो. मात्र मनोविकार झाल्यास त्याच व्यक्तीला दूर ठेवले जाते. ही सामाजिक वृत्ती बदलण्याची गरज आहे. -डॉ.प्रसाद देशपांडे, विभागप्रमुख, मानसोपचार, घाटी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *