Headlines

दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनामे वेगाने करा:नांदगावी आमदार सुहास कांदे यांच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना‎




दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वेळेत मिळावी, यासाठी पीक नुकसानीचे पंचनामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना आमदार सुहास कांदे यांनी दिल्या. पंचनाम्यांअभावी एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कृषी, महसूल, पंचायत समिती, पशुसंवर्धनसह विविध विभागांच्या खातेप्रमुखांची विशेष आढावा बैठक झाली. तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसानीचे पंचनामे, पाणीटंचाई आणि चाऱ्याची उपलब्धता याबाबत आढावा घेण्यात आला. तालुक्यात सध्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम सुरू असून, निश्चित उद्दिष्टाच्या सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम वेगाने करण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या. पंचनाम्यांचा अहवाल शासनाकडे तत्परतेने सादर करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीला अग्रक्रम देण्याचेही त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *