Headlines

बोल्हेगावात दुपारी चोरी, महिलेला मारहाण:7 तोळे सोने; रोकड लंपास पाळत ‎ठेवत साधला डाव‎




बोल्हेगाव येथील भोर मळा परिसरातील एका कॉलनीत भरदिवसा एका महिलेच्या घरात घुसून चोरी झाल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. सुनीता तुपेरे असे या पीडित महिलेचे नाव असून, दोन चोरट्यांनी घरात घुसून त्यांना मारहाण केली व दागिने, रोकड लुटून नेली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. पीडित महिलेच्या माहितीनुसार, त्या घरात झोपलेल्या असताना दोन अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश केला. महिलेचा गळा दाबून कानातील व गळ्यातील दागिने हिसकावून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि तोंडावर उशी दाबली. महिला मरण पावली असे वाटल्याने चोरट्यांनी उशी बाजूला काढली, तेव्हा महिलेने तोंडातील बोळा काढून त्यांना झटकून दिले. महिला ओरडेल या भीतीने चोरट्यांनी गाडीतून पळ काढला. या घटनेत चोरट्यांनी पाच ते सात तोळे सोन्याचे दागिने, १६ हजारांची रोकड आणि २ मोबाईल चोरून नेले आहेत. पाळत ठेवत साधला डाव बोल्हेगाव परिसरात सर्वत्र नागरी वस्ती वाढलेली आहे. बहुतांशी भाग दाट लोकवस्तीचा आहे. अशा परिस्थितीतही चोरट्यांनी महिलेवर व तिच्या घरावर पाळत ठेऊन, महिला दुपारच्या वेळी घरात एकटी असल्याचे पाहून डाव साधला. महिलेचा आवाज घराबाहेर जाऊ नये म्हणून तिच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *