Headlines

दिल्लीची छावणी झाली, आंदोलनात दगाफटका होऊ शकतो:प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप




दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावरून आणि प्रशासनाकडून होत असलेल्या धरपकडीवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “शासनालाच या देशात ‘सिव्हिल वॉर’ म्हणजेच यादवी घडवून आणायची आहे,” असा थेट हल्लाबोल त्यांनी केला आहे. तसेच, दंगलीसाठी प्रशिक्षण घेतलेले ५० हजार कार्यकर्ते दिल्लीत आणून ठेवण्यात आल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. दिल्लीला छावणीचे स्वरूप सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “दिल्ली ही सध्या छावणी झाली आहे, अशी परिस्थिती आहे. ट्रेन्स बंद आहेत, गाड्यांमधून लोकांना बाहेर काढून चेकिंग सुरू आहे. एका दृष्टीने तिथे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरून जे कार्यकर्ते आंदोलनासाठी दिल्लीला जात होते, त्यांना ठिकठिकाणी अडवण्यात आले आहे. मुंबईसारख्या शहरातही हुतात्मा स्मारकावर आंदोलन होईल, असे सध्याचे चित्र आहे.” “शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार हिरावला” शासनाच्या या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत ते म्हणाले, “शासनाची ही जी दडपशाहीची भूमिका आहे, ती पूर्णपणे बेकायदेशीर आणि गैरसंविधानिक आहे. शांततेने आंदोलन करणे हा नागरिकांचा संविधानिक अधिकार आहे, आणि तोच अधिकार शासन आज मारायला निघालेले आहे. आंदोलने याआधीही झाली आहेत आणि यापुढेही होतील, आतापर्यंतची सर्व आंदोलने शांततेतच पार पडली आहेत. मात्र, शासनाची सध्याची भूमिका पूर्णपणे चुकीची आहे.” 50 हजार कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप यावेळी प्रकाश आंबेडकरांनी सरकार आणि सत्ताधारी पक्षांवर सर्वात मोठा आणि गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “एकंदरीत मला असे दिसतेय की शासनालाच सिव्हिल वॉर पाहिजे आहे. माझ्याकडे जी माहिती आहे, त्यानुसार आरएसएस (RSS) आणि बीजेपी (BJP) यांनी दंगलीसाठी जे ५० हजार कार्यकर्ते ट्रेन केले आहेत, त्या सर्वांना दिल्लीमध्ये आणून ठेवलेले आहे. या आंदोलनात घुसून त्यांच्याकडून दगाफटका करण्याची दाट शक्यता आहे, असे मी मानतो.” —————- ही बातमी पण वाचा.. जंतरमंतरवर आंदोलकांची गर्दी, अनेक ताब्यात:रस्त्यावर ठोकले खिळे; दिपके मुंबईहून दिल्लीला, म्हणाले- ही ताकद नव्हे भीतीचे लक्षण ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आज दिल्लीतील जंतर-मंतर येथे निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि ‘SIR’ (एसआयआर) प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी या पक्षाने केली आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी या निदर्शनांसाठी परवानगी नाकारली आहे. निदर्शक जंतर-मंतर आणि कनॉट प्लेस येथे जमा होऊ लागले आहेत. पोलीस निदर्शकांना तिथून हटवत असून त्यांना ताब्यात घेत आहेत. CJP चे संस्थापक अभिजित दीपके हे देखील मुंबईहून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *