![]()
परतवाडा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या आठपैकी चार आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. चौघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता अहफाज खान मन्सूर खानची २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी वाढवण्यात आली तर अन्य तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी हार्ड डिस्क आणि लॅपटॉप जप्त केला होता. त्यामधील डेटा विश्लेषण करणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाकडे त्याच्या वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींना जाळ्यात अडकवायचे, त्यांच्यासोबत अश्लील वर्तन करायचे त्या वेळी त्यांचे फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करायचे. या प्रकरणात पोलिसांनी अयान अहमद या मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. या प्रकरणात आजवर अयानसह आठ जणांना अटक अयानने काढलेले व्हिडिओ त्याचाच मित्र उजेर खानने इतर मित्रांना व्हायरल केले होते. त्यांनी ते इतरत्र पसरवले. या प्रकरणात पोलिसांनी अयानसह आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. तसेच अयानला अमरावतीत फ्लॅट उपलब्ध करून देणाऱ्या मानव सुगंधे यालाही पोलिसांनी अटक केली होती. आठपैकी अहफाज खान मन्सूर खान, मानव दीपक सुगंधे, मोहंमद इमरान मोहंमद साबीर आणि शेख नावेद शेख हसन या चौघांना न्यायालयापुढे हजर केले होते.
Source link
परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणात 4 आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ:जप्त हार्डडिस्क, लॅपटॉपमधील डेटाचे विश्लेषण