Headlines

तिवस्यात शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या:रघुनाथपूर येथील अमोल मुंद्रे यांनी कर्जाच्या विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलले




तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर येथील शेतकरी पुत्र अमोल रामदासराव मुंद्रे (वय ३७) यांनी शनिवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी शेतातून घरी परतल्यानंतर अमोल चिंताग्रस्त होते. शनिवारी सकाळी कुटुंबीयांना घरातील बाजूच्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. अमोल मुंद्रे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे रघुनाथपूर गावात हळहळ व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *