Headlines

छत्रपती संभाजीनगरात लग्न लावून देत नसल्याच्या रागातून आईचे डोके फोडले:हर्सूल परिसरातील पत्थरवाडीतील घटना




लग्न लावून देत नसल्याच्या कारणावरून एका मद्यपी मुलाने जन्मदात्रीलाच बेदम मारहाण करत तिच्या डोक्यात दगड घातल्याची संतापजनक घटना हर्सूल परिसरातील पत्थरवाडी येथे घडली. या प्रकरणी अमर भाऊसाहेब गायकवाड (२५, रा. पत्थरवाडी) याच्यावर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालिंदा गायकवाड ( ६७) या फळविक्री करतात. ८ ऑक्टोबर रोजी रात्री त्या कामावरून घरी आल्या. रात्री ११ वाजेच्या सुमारास मुलगा अमर दारू पिऊन घरी आला. कंबर दुखत असल्याचा बहाणा करून त्याने आईला घाटी रुग्णालयात नेण्यास सांगितले. दोघेही रिक्षा पकडण्यासाठी घरासमोरील रस्त्यावर आले असता, अमरने आईचे केस पकडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. …अन् अनर्थ टळला भांडणाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेत कालिंदा यांची सुटका केली. डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने नागरिकांनी रिक्षाची व्यवस्था करून त्यांना हर्सूल पोलिस ठाण्यात पाठविले. या प्रकरणी पुढील तपास हवालदार कोलते करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *