![]()
नवरात्रोत्सवात घट विकून कुटुंबाला हातभार लावण्याची धडपड सुरू असतानाच भरधाव आयशरने दोघांचा जीव घेतला. नाशिककडून निफाडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात अभिषेक अशोक वाघचौरे (३१) आणि भिका चिमाजी धुळे (६०) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला असून, निफाड पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. अभिषेक वाहनचालक म्हणून काम करण्याबरोबरच शेतात आणि नर्सरीमध्ये मजुरी करत होते. प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अभिषेक यांचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या पत्नीचा जीवनसाथी आणि एक मुलाचे व एका मुलीचे पितृछत्र हरपले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोन कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे.
Source link
घट विकताना ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू:नाशिक-निफाड मार्गावर अपघाताची घटना