Headlines

1,610 गावांत पंचनामे पूर्ण झाल्याची सरकारी नोंद:प्रत्यक्षात 72.41 टक्केच, जिल्ह्यातील सर्व 14 तालुके दुष्काळी छायेत‎



एकीकडे दुष्काळाची तीव्रता तपासण्यासाठी केंद्रीय पथक बांधावर उतरले आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात पंचनाम्यांची गती संथ असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. २७ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या १३ दिवसांत जिल्ह्यातील सर्व १ हजार ६१० गावांचे पंचनामे १०० टक्के पूर्ण झा

.

जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १४ तालुके दुष्काळी छायेत आले आहेत. २७ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर अशा १३ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही प्रशासनाला केवळ ७२.४१ टक्के खातेदारांचेच पंचनामे पूर्ण करता आले आहेत.प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व १ हजार ६१० गावांचे पंचनामे १०० टक्के पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले आहेत.

मात्र, गावांची आकडेवारी १०० टक्के असताना त्या गावांत राहणारे खातेदार असलेले ३ लाख ३४ हजार १९२ शेतकरी अद्याप शासकीय पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत आहेत. तब्बल २ लाख ७७ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावरील हे खातेदार शेतकरी आहेत. ज्यांच्या बांधावर अजून यंत्रणा पोहोचलेली नाही.

सरकारचा पंचनाम्यांचा केवळ देखावा ^ पीक पाहणी झाली, पंचनामे होत आहेत.शेतीतून ३० टक्के देखील उत्पादन यंदा निघालेले नाही. अशा स्थितीत महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाने पंचनाम्यांचा संयुक्त अहवाल थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे अपेक्षित आहे. पंचनाम्यापासून एकही गुंठा जागा वंचित राहू नये. सरकार केवळ पंचनाम्यांचा देखावा करत आहे. आता सरकारने दसरा सणापुर्वीच शेतकरी वर्गाला मदत द्यावी. -अनिल औताडे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

पुढील ८ दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण होणार ^पंचनाम्याासाठी जिल्ह्यातील सर्व गावांत प्रशासकीय यंत्रण पोहचलेली आहे.३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्यांना व ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्यांना िनकषाप्रमाणे ही मदत दिली जाणार आहे. पुढच्या ८ दिवसांत हे पंचानामे पूर्ण होतील. सुधाकर बोराळे, कृषी अधीक्षक, अहिल्यानगर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *