Headlines

कृषी पर्यटन केंद्र हा मातीशी नाळ जोडणारा उपक्रम- जाधव:कृषी पर्यटन कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम; मान्यवर सहभागी




अकोला शेतकरी बांधवांना कृषी पर्यटन धोरणांतर्गत पूरक व्यवसायाकरिता प्रोत्साहन देण्यासाठी कन्हेरी सरप येथील कृषी पर्यटन केंद्रात एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ग्रामीण भागातील माती, माणसं, संस्कृती, परंपरा, निसर्ग व खाद्यसंस्कृती आदींबाबत भावी पिढीला माहिती होणे आवश्यक आहे. कृषी पर्यटन केंद्रातून विविध घटकांच्या माध्यमातून ग्रामीण जीवनदर्शन घडवण्यात येते. त्यामुळे हे केंद्र मातीशी नाळ जोडणारा उपक्रम ठरेल, असे प्रतिपादन अमरावती पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालिका मोसमी कोसे, शाश्वत विकास केंद्र, अमरावतीचे गणेश चौधरी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ प्रा. डॉ. नितीन कोंडे, कृषी विद्यापीठाच्या मृद व जलसंधारण विभागाचे प्रा. राजू इस्वाळ, सहा. पर्यटन अधिकारी किरण गाडेकर, शिवाजी गायकवाड, उपलेखापाल राजेश मोहिते यांच्यासह अमरावती विभागातील प्रगत शेतकरी व कृषी पर्यटन केंद्रांचे संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर कीर्ती बिरारे व चमूने श्री गणेश वंदना सादर केली. कृषी पर्यटन केंद्रात लोककला, हस्तकला, गीत, पारंपरिक वाद्य, खाद्यपदार्थ आदी लोप पावत असलेल्या घटकांची दर्शनी स्वरूपात मांडणी केल्याने ग्रामीण संस्कृतीचे जतन होईल. नवीन पिढीला याविषयी माहिती मिळेल. अमरावती शाश्वत विकास केंद्राचे गणेश चौधरी यांनी कृषी पर्यटन केंद्रातील विविध सुविधांबाबत उपस्थित शेतकरी बंधूंना माहिती दिली. केंद्रात समायोचित मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी अमरावती विभागातील उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्रांचा व प्रगत शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात मोहन तेजराव जगताप, मामाच वावर कृषी पर्यटन केंद्र, वळती, जिल्हा बुलडाणा, विजय श्रीराव, महेंद्री कृषी पर्यटन केंद्र, वरूड, जिल्हा अमरावती, नागेश कन्नामे, रोअर कृषी पर्यटन केंद्र, जिल्हा यवतमाळ, प्रकाश पोहरे, वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्र, कण्हेरी सरप, जिल्हा अकोला, राहुल देशमुख, नेचर ब्लीस कृषी पर्यटन केंद्र, जिल्हा वाशीम आदी केंद्रांचा समावेश आहे. कन्हेरी सरप येथील कृषी पर्यटन केंद्र येथे आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवर. …तर कळतील बारकावे अन् शास्त्रीय कारणे गावांचे शहरीकरण झाल्याने ग्रामीण संस्कृतीतील पारंपरिक पीक पद्धती व खाद्यसंस्कृतीचा ऱ्हास झाला आहे. माती ही सुद्धा माणसाप्रमाणे सजीव आहे. मातीचे गुणधर्म मुलांनी प्रत्यक्ष अनुभवले तरच त्यांना त्याबाबतचे बारकावे व शास्त्रीय कारणे कळतील. कृषी पर्यटन केंद्रातून निसर्गाचे विज्ञान, कृषीविज्ञान, प्रत्येक सजीव प्राण्यांचे जीवनचक्र याविषयी भावी पिढीला ज्ञान मिळेल. या माध्यमातून सुजाण पिढी निर्माण होईल, असे प्रा. डॉ. नितीन कोंडे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *