Headlines

गुन्हे रोखण्यासाठी पोलिस पाटलांनी मदत करावी- एसपी:डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडून फुलंब्री पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी, कर्मचाऱ्यांशी संवाद




छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी गुरुवारी फुलंब्री पोलिस ठाण्याला भेट देत वार्षिक तपासणी पूर्ण केली. सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.०० या वेळेत त्यांनी सविस्तर पाहणी केली. दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत अभिलेख तपासले. तपासणीदरम्यान त्यांनी ठाण्यातील अंमलदारांची किट पाहणी केली. दैनंदिन कामकाजाचे अभिलेख पडताळले. ठाणे परिसर, स्वच्छता याबाबत समाधान व्यक्त केले. आवश्यक सूचना दिल्या. तपास अधिकारी, अंमलदारांकडील प्रलंबित गुन्हे तपासले. तपासाच्या फाइल्स पाहिल्या. तपासाची सद्यस्थिती जाणून घेतली. ठाणे हद्दीतील पोलिस पाटलांची बैठक घेतली. डॉ. राठोड यांनी पोलिस पाटलांच्या भूमिकेचे महत्त्व सांगितले. गुन्हे रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर मदत करण्याचे निर्देश दिले. तपासासाठी सहकार्य करण्यास सांगितले. महापुरुषांचे पुतळे बसवताना रीतसर प्रशासकीय परवानगी बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. गावात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवण्यास सांगितले. संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश दिले. तपासणीच्या शेवटी त्यांनी ठाण्यातील अधिकारी, अंमलदारांची वृंद परिषद घेतली. कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील अडचणी समजून घेतल्या. पोलिस ठाण्याची इमारत, कर्मचारी निवासस्थाने यांच्या स्थितीबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे, पोलिस निरीक्षक संजय सहाने, सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी वडते, पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांच्यासह फुलंब्री ठाण्यातील इतर अधिकारी, अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *