![]()
अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर पिकअप आणि टिप्पर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात पिकअपमधून वाहतूक करण्यात येणाऱ्या 4 जनावरांचाही मृत्यू झाला. रविवारी (11 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजेच्या सुमारास बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात बरड फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जनावरांना घेऊन जात असताना दुर्घटना मिळालेल्या माहितीनुसार, पिकअपमधून जनावरांची वाहतूक केली जात होती. आठवडी बाजारातून जनावरे घेऊन जात असताना बरड फाट्याजवळ पिकअप आणि टिप्पर यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत पिकअप आणि टिप्परचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाले. अपघातात पिकअपमधील 4 जनावरांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एकाच वेळी दोन मानवी जीवांसह चार जनावरांचा मृत्यू झाल्याने या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अपघाताचे गांभीर्य लक्षात आले. महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरच हा अपघात झाल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. अपघातग्रस्त वाहनांमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नाही. या भीषण दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा… भंडारा पोलिसांची रेती माफियांवर मध्यरात्री धडक:3.49 कोटींचा मुद्देमाल जप्त, 27 वाहने ताब्यात भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी मध्यरात्री मोठी धडक कारवाई केली. 11 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आथली येथील शेतशिवार आणि नदीपात्र परिसरात छापा टाकून पोलिसांनी तब्बल 3 कोटी 49 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत 27 वाहने ताब्यात घेण्यात आली असून, 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, कारवाईची चाहूल लागताच अनेक वाहनचालक आणि मालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे. या मोठ्या कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…
Source link
बीडमध्ये पिकअप-टिप्परची समोरासमोर भीषण धडक:2 जणांचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; 4 जनावरांचाही अंत