Headlines

उभ्या टिप्परवर कार मागून‎धडकली; दांपत्याचा मृत्यू‎:सासरवाडीतून परतताना काळाची झडप‎




बोरवंड रस्त्यावरील उमरी‎फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या‎असणाऱ्या टिप्परवर कार मागून‎ आदळली. शनिवारी (१०‎ऑक्टोबर) रात्रीच्या या अपघातात ‎रोहित दिलीपराव शेळके (३८)‎ आणि माधवी रोहित शेळके (३५)‎या दांपत्याचा मृत्यू झाला. ते ब्रह्मपुरी‎ (ता.परभणी) येथे सासरवाडीला ‎गेले होते. तेथून परत येताना हा‎ अपघात झाला. अपघातात रितीक्षा‎ शेळके (११) ही चिमुकली गंभीर‎ जखमी झाली‎ .‎ परभणी येथील गांधी पार्कातील‎ रहिवासी शेळके दांपत्य मुलगी‎ रितीक्षासह ब्रह्मपुरीला गेले होते.‎ तेथून ते कारने परत येत होते. उमरी‎ फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या‎ असलेल्या टिप्परवर (यूपी-८५‎सीपी-५४६२) कार (एमएच-२२‎एच २९६१) मागून धडकली. या‎ अपघातात कारच्या समोरील सीटवर‎ बसलेल्या शेळके दांपत्याचा मृत्यू‎ झाला. तर मुलगी रितीक्षा गंभीर‎ जखमी झाली. रोहित यांचा मोठा ‎मित्रपरिवार आहे. त्यांचा शहरात‎ हॉटेलचा व्यवसाय आहे. रोहित ‎यांच्या पश्चात दोन मुली, भाऊ,‎वहिनी व आई असा परिवार आहे.‎ जखमी रितीक्षाने मामाला फोन करून दिली माहिती शेळके दांपत्य कारच्या पुढील सीटवर बसले होते. त्यामुळे दोघांना गंभीर‎ मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मागील सीटवर बसलेली रितीक्षा ‎जखमी झाली. त्या अवस्थेतही रितीक्षाने प्रसंगावधान राखून वडिलांच्या‎ फोनवरून मामाला फोन केला, तसेच अपघाताची माहिती दिली. त्यानंतर ‎तिचे मामा व त्यांचे मित्र अपघातस्थळी आले. त्यांनी रितीक्षाला‎ दवाखान्यात नेले. रितीक्षाची दुसरी बहीण घरीच असल्याने बचावली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *