![]()
शिवसेना (उबाठा) पक्षाचे ठाण्यातील नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी संतोष कनोजिया ऊर्फ ‘टल्ली’ आणि त्याच्यासोबत असलेला हेल्मेटधारी तरुण अमितसिंह ऊर्फ ‘पपलू’ या दोघांना ठाणे गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून बेड्या ठोकल्या. दोघेही हत्येनंतर रायगडमार्गे उत्तर प्रदेशात पळून गेले होते. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील न्यायालयात हजर केल्यानंतर या दोन्ही आरोपींना १३ ऑक्टोबरपर्यंतचा ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आला. आज ठाणे पोलिसांनी त्यांना आपल्या खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात घेतले आहे. सोमवारी त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात येईल. ८ दिवस यूपीत तपास प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशमध्ये पसार झाले होते. ठाणे पोलिसांनी अत्यंत वेगाने सूत्रे हलवत सलग ८ दिवस उत्तर प्रदेशचा कोपरान् कोपरा पिंजून काढला. अखेर शुक्रवारी रात्री पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले.
Source link
प्रदीप पूर्णेकर हत्या:प्रयागराज येथून मुख्य आरोपींना अटक, दोन्ही आरोपींना 13 ऑक्टोबरपर्यंत ट्रान्झिट रिमांड